करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.
अक्कलकोट | प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील श्री शिव सोमनाथ शिवाचार्य संस्थान मठ यांच्या मठाधिपतींचा पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात, वेदमंत्रांच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जगद्गुरु श्रीमद् रंभापुरी पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्नरेणुक डॉ. वीरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्य भागवत पाद बाळेहुन्नूर रंभापुरी यांच्या दिव्य सानिध्यात हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार पडला.
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील श्री शिव सोमनाथ शिवाचार्य संस्थान मठ यांच्या मठाधिपतींचा पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात, वेदमंत्रांच्या गजरात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जगद्गुरु श्रीमद् रंभापुरी पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्नरेणुक डॉ. वीरसोमेश्वर राजदेशी केंद्र शिवाचार्य भागवत पाद बाळेहुन्नूर रंभापुरी यांच्या दिव्य सानिध्यात हा ऐतिहासिक धार्मिक सोहळा पार पडला.
सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजता जगद्गुरुंसह श्री मुरुगेंद्र शिवाचार्य यांचे हिरेमठ येथे आगमन झाले. त्यानंतर श्री १०८ षटस्थल ब्रह्मी मुगेंद्र शिवाचार्य यांच्या कर्तृ समाधीसमोर महाउपदेश कार्यक्रम पार पडला. धर्मसभेत मार्गदर्शन करताना जगद्गुरूंनी करजगीतील मठाचा विकास आणि धार्मिक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्व भक्तांनी तन, मन आणि धनाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता करजगी, बंकलगी, कुंभारी तसेच परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य धर्मसभा पार पडली.
यावेळी पूज्य श्री रेणुक देवरू यांना श्री षटस्थल ब्रह्मी मल्लिकार्जुन शिवाचार्य उदयेश्वर मठ, नागठाणे यांच्या हस्ते षटस्थल ब्रह्मोपदेश देण्यात आला. नूतन पट्टाधिकारी श्री १०८ षटस्थल ब्रह्मी श्री शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ यांनी धर्मोपदेश करताना मठाची परंपरा, वैभव आणि कीर्ती वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजाला योग्य दिशा देत पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने मठाचा कारभार चालविणार असल्याचे त्यांनी सांगितले.या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ती करजगी गावातून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू झालेली ही मिरवणूक देवी अंबाबाई मंदिर, हनुमान मंदिर, चौडेश्वरी देवी मंदिर, वीरभद्रेश्वर मंदिर आणि नरसिंह मंदिर मार्गे श्री मुरगेंद्र मठापर्यंत पोहोचली.
सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत कर्नाटक सीमाभागातील मानवी स्वरूपातील विशाल कटपुतळी बाहुल्या, विविध पारंपरिक वेशभूषा, हलगी, चिटहलगी, ढोल-ताशांच्या गजराने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
करजगी, आहेरवाडी, बंकलगी, कुंभारी यांसह पंचक्रोशीतील ३० ते ४० गावांमधून हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. अंजुटगी, अनचगी आणि इतर अनेक गावांतील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत धार्मिक उत्सवाची शोभा वाढविली.कार्यक्रमादरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. डॉ. हेगडेवार रक्तपेढीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. तसेच सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या महाप्रसादाचे नियोजन अॅड. दयानंद उंबरजे व समितीच्या वतीने करण्यात आले.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अक्कलकोट तालुक्याचे माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद पाटील, करजगी गावचे सरपंच विवेकानंद उंबरजे, कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अॅड. दयानंद उंबरजे, सोमसिद्ध बुळळा यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अॅड. दयानंद उंबरजे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “करजगी गावातील श्री शिव सोमनाथ शिवाचार्य संस्थान मठ हे गावाचे धार्मिक वैभव आहे. कोणताही दुजाभाव न करता दोन्ही मठांच्या मठाधीशांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेऊन समाजहिताची कार्ये पुढे नेली पाहिजेत.”या भव्य सोहळ्यास श्री १०८ षटस्थल ब्रह्मी श्री गुरु पंचाक्षरी शिवाचार्य हिरेमठ मलकवते, डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हिरेमठ गौडगाव, शिवयोगी शिवाचार्य हिरेमठ, शांतलिंग शिवाचार्य हिरेमठ, शांतवीर शिवाचार्य हिरेमठ चलगेरी, उपमन्यू शिवाचार्य हिरेमठ ऐनापूर, वीरपाक्ष शिवाचार्य मनुरकर महाराज, श्रीकंठ शिवाचार्य, शिवानंद शिवाचार्य हिरेमठ, सोमशेखर देवरू, चंद्रशेखर शिवाचार्य, अभिनव रुद्रमणी शिवाचार्य, संगणबसव शिवाचार्य, मल्लिकार्जुन शिवाचार्य हिरेमठ, गुरुलिंग शिवाचार्य गुंडकनाळ, शिवरुद्र शिवाचार्य रचोटेश्वर, मुपीनाऱ्या शिवाचार्य हिरेमठ, गुरु पादेश्वर शिवाचार्य हिरेमठ, रेवणसिद्ध शिवाचार्य हिरेमठ, शिवानंद महास्वामी, बसवलिंग महास्वामी, प्रभूशांत महास्वामी, बसवराजेंद्र महास्वामी, गुरुलिंग महास्वामी, बाल तपस्वी श्री द्वितीय सांब शिवयोगी शिवाचार्य यांच्यासह अनेक मठाधीश उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जेरटगी येथील प्रवचनकार श्री मडीवाळय्या शास्त्री यांनी केले. स्वागत, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन अॅड. दयानंद उंबरजे यांनी केले. धार्मिक परंपरा, अध्यात्म, समाजसेवा आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा करजगीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणारा ठरला.
-------------------------------------
▪️ जनता संघर्ष न्यूज सोलापूर
▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240












Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240