शाहू स्पोर्ट्स क्लब दक्षिण सोलापूर आयोजित उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन.
प्रतिनिधी -अंत्रोळी, ता.द. सोलापूर
शाहू स्पोर्ट्स क्लब दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जि. प. शाळा अंत्रोळी येथे उत्साहात पार पडले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय खो-खो पंच तथा सोलापूर खो-खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे सर प्रमुख उपस्थित होते. तसेच शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूरचे खजिनदार नागनाथ म्हमाने, मार्गदर्शक सदानंद गुजले, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत कोकरे यांची उपस्थिती लाभली.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना खो-खो खेळाचे तांत्रिक प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती तसेच खेळातील शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------------------------
* जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
* बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240