बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती संपन्न.
![]() |
| बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांचा सत्कार करताना चौडेश्वरी देवस्थानचे चेअरमन शिवशरण लकाबशेट्टी व अन्य दिसत आहेत. |
तालुक्यातील बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती भाविक भक्तांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठया भक्तीभावात संपन्न झाली. आरती नंतर श्री चौडेश्वरी देवस्थानचे चेअरमन शिवशरण लकाबशेट्टी यांच्या हस्ते देवीजींचे कृपावस्त्र, श्रीफळ, प्रसाद देऊन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व प्रथमेश इंगळे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यानंतर श्री चौडेश्वरी देवस्थानचे चेअरमन शिवशरण लकाबशेट्टी व पदाधिकाऱ्यांचा श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी देवीची ओटी भरुन मोठ्या भक्तीभावात शासकीय बाशिंग देवीस अर्पण करण्यात आले. यावेळी देवस्थानचे पुजारी मल्लिकार्जुन सोमेश्वर, चंद्रेशखेर पुजारी, राजा उंबरजे सर, गंभ्मीर मड्डी, श्रीशैल खानापूरे सर, संजय मडडी, निलकंठ पाटील, डॉ तिपण्णा देगाव, शिवपुत्र मड्डी, भोगेश्वर लकाबशेट्टी, शरण खानापूरे, महेश सोमेश्वर, ऋषिकेश सोमेश्वर, रमेश शिंदे सर, गावचे सरपंच, ग्रामसेवक, आजी माजी सरपंच पदाधिकारी पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------
* बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240



Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240