ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज दि.३१ मे रविवारी भव्य कार्यगौरव सोहळा.
प्रतिनिधी |सोलापूर
सोलापूर, प्रतिनिधी : सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ नेते हमीरसिंह ऊर्फ हेमू चंदेले यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार व कार्यगौरव समारंभ रविवारी (दि. ३१ मे) सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राचे उपाध्यक्ष प्रा. विलास बेत आणि सचिव रवींद्र मोकाशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या विशेष सोहळ्याला खासदार शाहू शहाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राहणार आहेत.कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार रजनी पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पवार, माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हेमू चंदेले हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई छन्नुसिंह चंदेले आणि स्वातंत्र्य सैनिक गजरादेवी चंदेले यांचे सुपुत्र आहेत. त्यांना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री उमाशंकर दीक्षित आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा सहवास लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हेमू चंदेले यांची वैचारिक जडणघडण झाली.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी शास्त्रीनगर परिसरातील वंचित नागरिकांसाठी तब्बल १५ वर्षे मोफत दवाखाना चालविला. तसेच समाजहिताचा वारसा जपण्यासाठी प्रियदर्शिनी प्रबोधन मंच आणि भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्र या संस्थांची स्थापना केली. हैदराबाद रस्त्यावरील विडी कामगारांच्या घरकुलांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी त्या परिसरात शाळा सुरू करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले.अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हेमूजी चंदेले अमृत महोत्सव सत्कार समितीमध्ये माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सुधीर खरटमल आणि राकेश टोळ्ये हे सल्लागार असून तुळशीदास जव्हेरी, सुनील दावडा, श्रीनिवास जक्कन, अमृतदत्त चिन्नी, रुस्तम कंपली, अंबादास शिंदे आणि नीलेश गायकवाड यांचा समावेश आहे.
या कार्यगौरव सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस सुधीर खरटमल, अंबादास शिंदे, रुस्तम कंपली, अमृतदत्त चिन्नी आदी उपस्थित होते.

-------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240