पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट द्या; पत्रकार सुरक्षा समितीचे धरणे आंदोलन.

 
सोलापूर (प्रतिनिधी)  
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकीतून पत्रकार सातत्याने कार्य करत असतात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी तालुका व ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार प्रवास करावा लागतो. यासाठी अनेक पत्रकार दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा वापर करतात. मात्र, प्रत्येक वेळी टोल भरावा लागत असल्याने पत्रकारांवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याची भावना व्यक्त करत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने रविवारी जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये वार्तांकनासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना नियमित ये-जा करावी लागते. त्याचबरोबर आमदार, खासदार, मंत्री यांच्या सभा, बैठका, दौरे व विविध कार्यक्रमांचे वृत्तांकन करण्यासाठीही पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. त्यामुळे पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट द्यावी, अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीने सातत्याने लावून धरली आहे.याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिनांक 16 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच 12 सप्टेंबर 2025 रोजी पुणे विभागीय आयुक्तांची भेट घेऊन टोलमुक्तीसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने पत्रकार सुरक्षा समितीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी जिल्हा परिषद (पूनम गेट) येथे धरणे आंदोलन केले.
यावेळी
“कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही”,
“आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”,
“पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो”
अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना राज्य सरकारने तातडीने टोलमधून सूट द्यावी, अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.या आंदोलनात पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड, सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी, शहर कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, दैनिक अबतकचे संपादक प्रसाद जगताप, जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे, तसेच विष्णू सकट, संदीप धोत्रे, परमेश्वर आटीपामूल, श्रीनिवास पेद्दी, रमेश अपराध, गणेश निंबाळकर यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------------
 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
संपादक-सिद्धार्थ भडकुंबे
 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.