Posts

Showing posts from July, 2025

पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवारतर्फे पत्रकार इरफान शेख व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  महाराष्ट्र टाईम्सचे सोलापूर शहर प्रतिनिधी इरफान शेख आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांचा वाढदिवस पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आवारातील हिरवळ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात शाल, टोपी, पुष्पहार घालून व पेढे भरवून दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांच्या शुभेच्छांच्या वातावरणात वाढदिवसाचे औचित्य साजरे झाले. वाढदिवसानंतर पत्रकार इरफान शेख आणि जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी आयोजक पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार यांचे मन:पूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला अप्पासाहेब लंगोटे, सैफन शेख, युनूस अत्तार, नाना प्रक्षाळे, डि. डि. पांढरे, अस्लम नदाफ, नितीन करजोळे, सिद्धाराम नंदर्गी, विजयकुमार बाबर, रवि ढोबळे, विशाल भांगे, राजेंद्र कांबळे, शेखर बंगाळे, यासिन शेख, हुजेफ इनामदार, नागेश पासकंटी, जाफर सगरी यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची निवड.

Image
प्रतिनिधी-सोलापूर विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची अखेर सात महिन्यानंतर निवड जाहीर झाली. अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सातलिंग अण्णाराव शटगार यांची या पदावर सातलिंग शटमार निवड प्रसिद्धीप्रमुख, झाली. वरिष्ठ उपाध्यक्ष या जवाबदाऱ्या सांभाळल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीवरुन शटगार यांना हे प्रमोशन मिळाले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा मंगळवारी रात्री करण्यात आली. त्यात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमध्ये सुशिलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. लोकसभेत सोलापूरमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले. पण विधानसभेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे तत्कालिन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाती...

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट येथे बैठक संपन्न.

Image
अक्कलकोट (प्रतिनिधी)  साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित बैठकीचे आयोजन मातंग समाज अध्यक्ष सुनिल अण्णा खवळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या बैठकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या नूतन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली. समितीचे अध्यक्षपदी श्रीपाद भैय्या खवळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी आदिनाथ कांबळे, सेक्रेटरीपदी समर्थ देवकुळे, सहसेक्रेटरी जनार्दन शितोळे, खजिनदारपदी प्रेम केंदळे, सहखजिनदार तानाजी खवळे यांची निवड झाली. कार्याध्यक्ष म्हणून समर्थ खंदारे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीचे प्रमुख म्हणून बाबाजी कांबळे, दगडू पारखे, अनिल केंगार, बाळू क्षीरसागर, विकास हातागळे, सचिन ऐवळे, दत्ता बनसोडे, राहुल गिजगे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आधारस्तंभ म्हणून अनिल गवळी, नामदेव क्षीरसागर, अंबादास कांबळे, ठकशेन शितोळे, राजू बनसोडे, राहुल देविदास क्षीरसा...

आषाढी यात्रेत पंढरपूरसह सहा जिल्ह्यांत दोन कोटी भाविक सहभागी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Image
प्रतिनिधी -पंढरपूर,  यं दाच्या आषाढी वारीत पंढरपूरसह पुणे, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतील पालखी मार्गांवर एकूण दोन कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. पंढरपूर शहरातील श्रीयश पॅलेस येथे आयोजित आषाढी यात्रा २०२५ कृतज्ञता मेळाव्या प्रसंगी मंत्री गोरे बोलत होते. या वेळी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील अधिकारी, सरपंच, कर्मचारी, तसेच वारकरी सेवा करणारे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यत्रणांचे उत्तम नियोजन व कार्य कौतुकास्पद या   वेळी मंत्री गोरे म्हणाले, पालखी मार्गावरील गावागावांतून, तसेच पंढरपूर नगरीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. पंढरपूरमध्ये प्रत्यक्ष २५ लाख भाविक आले, तर दीड कोटीहून अधिक लोकांनी पालखी मार्गावर संतांच्या दर्शनाचा लाभ घेतला.” कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, पुणेचे सीईओ गजानन पाटील, साताऱ्याच्या सीईओ याशनी नागराजन, तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, ...

श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्ताने अकोले काटी येथे महाप्रसादाचे आयोजन; समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

Image
प्रतिनिधी-उ. सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारस व नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन समता परिषद रणरागिणी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सौ. उमा नागेश अकोलकर माळी यांनी केले होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभली ती संत शिरोमणी सावता माळी महाराजांचे वंशज आणि अरण तीर्थक्षेत्र चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. सावता महाराज वसेकर यांची. त्यांच्यासोबत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भंडारे, नागनाथ मंदिर देवस्थानचे पुजारी गोकुळ मारुती ढगे महाराज, सचिन महाराज, तालुका अध्यक्ष बबन माळी, विद्यमान उपसरपंच सतीश लामकाने, अनंत अकोलकर, जयश्री माळी, संध्या माळी तसेच अकोले काटी येथील ग्रामस्थ व महिला कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.या वेळी एकत्रितपणे महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमात नुकतीच निवड झालेल्या समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, संत शिरोमणी सावता माळी महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर तसेच बापूसाहेब भंडारे यांचा सत...

"एक राखी सैनिक बांधवांसाठी"-सह्याद्री फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.

Image
प्रतिनिधी -सोलापूर, कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सह्याद्री फाउंडेशनतर्फे  “एक राखी सैनिक बांधवांसाठी” हा प्रेरणादायी उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी आपल्या प्रेमाच्या, अभिमानाच्या आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत हातांनी बनवलेल्या राख्या थेट सीमेवर लढणाऱ्या आपल्या वीर जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. नेताजी भाऊ खंडागळे यांनी या उपक्रमाची घोषणा करत सर्व शाळांतील विद्यार्थिनींना राखी पाठवण्यास आवाहन केले. राखी पाठविण्याची अंतिम तारीख: १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांना विनंती करण्यात येते की स्थानिक सह्याद्री फाउंडेशन प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

पोलीस उपनिरीक्षक पदभार स्विकारल्यानंतर महेश इंगळे यांच्या हस्ते पो.उ.नि.दत्तात्रय घंटे यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार

Image
पो.उ.नि.दत्तात्रय घंटे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सुनिल कटारे, बंडोपंत घाटगे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी-सोलापूर             घंटे हे आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने पोलीस खात्याची सेवा करीत आहेत. त्यांची अनुशासक कार्यप्रणाली ही त्यांच्या सेवेची जमेची बाजू आहे. त्यांनी अक्कलकोट येथे असताना पोलीस खात्यातील सेवेच्या माध्यमातून वटवृक्ष मंदीरात निर्मळ मनाने उदात्त सेवा दिली आहे. त्यांच्या या सेवेचे फलीत म्हणजे पोलीस खात्यात त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर झालेली पदोन्नती आहे. या माध्यमातून दत्तात्रय घंटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी झालेली पदोन्नती म्हणजे घंटे यांच्या निर्मळ सेवेचे फळ असल्याचे प्रतिपादन येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. नुकतेच पाकणी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र येथे कार्यरत असलेल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घंटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती होवून पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दत्तात्रय घंटे यांनी सर्वप्रथम आपले आराध्य दैवत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट ...

सोलापूरच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ – सालार टोळीवर ‘मोक्का’खाली कारवाई.

Image
प्रतिनिधी-सोलापूर हरातील कुख्यात सालार टोळीवर अखेर पोलिसांनी कडक कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मौलाना आझाद चौकात घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर, टोळीविरोधात संघटित गुन्हेगारीचे ठोस पुरावे सापडल्याने ही कारवाई करण्यात आली. घ टनेचा तपशील- दि. 2 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता, मौलाना आझाद चौक, नई जिंदगी परिसरात, सोहेल रमजान सय्यद या युवकाने उसनवारी परत मागितली असता फैसल सालारसह टोळीतील इतरांनी त्याच्यावर हल्ला केला. फैसलने चाकू दाखवून धमकी दिली, “मैं इधर का भाई हूँ… कोई आगे आया तो खल्लास कर दूंगा!” म्हणत पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. बचाव करताना फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली तर नागरिकांनी घरांमध्ये आसरा घेतला. पोलिसांनी IPC व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. टोळीचा इतिहास- 2015 पासून सोलापुरात सक्रिय असलेल्या सालार टोळीमध्ये फैसल सालार, जाफर शेटे, टिपू सालार, पापड्या, अक्रम पैलवान आणि वसीम उर्फ मुकरी यांचा समावेश आहे. खंड...

नियमीत स्वामी नामस्मरणाने जीवनला नवचैतन्य प्राप्ती - जेष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल.

Image
जेष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश मालक इंगळे, पो.नि.राजेंद्र टाकणे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट          येथील वटवृक्ष निवासी स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त आहोत. वर्तमानकाळात स्वामींची लिला व चमत्काराविषयी शब्दांची संरचना कमीच आहे. त्यांच्या महतीविषयी बोलावे तितके कमीच. त्यांचे चरित्र व कार्य शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे असून माझ्या सारख्या स्वामी भक्ताला आलेल्या अनुभवातून सांगायचे झाल्यास स्वामींच्या नित्य नामस्मरणाने जीवनातील प्रत्येक कामाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन बनतो. या माध्यमातून नियमीत स्वामी नामस्मरणाने माझ्या उतारवयातील जीवनलाही नवचैतन्य प्राप्ती लाभत आहे असे मनोगत मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केल्या. त्या नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिनेत्री अलका कुबल यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित सन्मान केला....

सोलापूरमध्ये टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन.वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु वाय.एच

Image
प्रतिनिधी-सोलापूर प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत सोलापूर शहर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, सिव्हिल UPHC आणि बापुजी नगर हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे नेतृत्व वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय.एच. सर यांनी केले. शिबिरात एकूण 69 रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये 33 संशयित रुग्णांची छातीचा क्ष-किरण (X-ray) तपासणी करण्यात आली असून 9 संशयित रुग्णांचे थुंकी नमुने (sputum sample) संकलित करण्यात आले आहेत. रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचारही करण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. पल्लोलु सर यांनी टीबी रोगाचे कारणे, लक्षणे, तपासण्या, औषधोपचार व महापालिकेच्या वतीने मिळणाऱ्या मोफत सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांना TB STTS बगाडे अनिल सर व TB HV मनोज सोनकांबळे यांनी सहकार्य केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी PHN कविता पवार, ANM शिल्पा वानोळे, अरणोदय जंगम, कोमल सुतार, शिवकन्या सानप, शिपाई मा.पाँल दयावरकोंडा, आशा मार्था डल्लु, नंदीनी पल्लोलु, रेणुका बोल्ली, नरसमा तल्लाटी, कांचन माने, प्रीत...

'एआय’चा वापर करून एसीएस हॉस्पिटलमध्ये यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला मानाचा तुरा.

Image
सोलापूर | प्रतिनिधी सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकत एसीएस हॉस्पिटलने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने एकाच दिवशी तीन अतिजटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. भैय्या चौक येथील या रुग्णालयात सोमवार, दिनांक २२ जुलै रोजी या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, या यशस्वी उपक्रमामुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षमतेला एक नवा आयाम मिळाला आहे. या शस्त्रक्रिया आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसकरण सिंग दुग्गल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रमोद पवार आणि डॉ. सिद्धांत गांधी यांनी केल्या. या यशाबद्दल शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. हृदयाच्या आजारांवरील अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत आयव्हस, रोटा अब्लेशन, बायफरगेशन एन्जोप्लास्टी, इंट्रावॅस्क्युलर लिथोट्रिप्सी आणि अल्ट्रा लो कॉन्ट्रास यांसारख्या अत्याधुनिक पद्धती वापरण्यात आल्या. यामध्ये AI चा वापर करून निदान केल्यास शस्त्रक्रियेची अचूकता मोठ्या प्रमाणात वाढते, हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. सोमवारी आयोजित कार्यशाळेत डॉ. दुग्गल यांनी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि शस्त्रक्रियेत सहभाग घेतला...

जल जीवन मिशन अंमलबजावणीसाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा -शिष्यपाल सेठी

Image
प्रतिनिधी सोलापूर     जिल्ह्यात जल जीवन मिशनची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल शेठी यांनी व्यक्त केले.      सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आलेले शिष्यपाल शेठी यांनी आज जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) - २ अंतर्गत अकोलेकाटी व कारंबा ग्रामपंचायतीस भेट दिली.या प्रसंगी याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, उत्तर सोलापूरचे गट विकास अधिकारी राजाराम भोंग, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उपअभियंता योगीराज बेंबळगी, नाबार्डचे महेश शिरपूर, पी.एच.कुलकर्णी, संवाद सल्लागार सचिन सोनवणे , क्षमता बांधणी सल्लागार शंकर बंडगर, शाखा अभियंता जयवंत जाधव, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अकोलेकाटी व कारंबा या ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला.अकोलेकाटी येथे यावेळी सरपंच सौ.अंजली क्षिरसागर, उपसरपंच सतिश लामकाने,सदस्य सर्जेराव पाटील, नंदा अष...

पत्रकार कृती समिती व आप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व गौरव.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  युवा नेते(रॉकी) बंगाळे यांची बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार पत्रकार कृती समितीच्या वतीने करण्यात आला. त्याचप्रमाणे हनुमंत कुलकर्णी यांची भाजपाच्या राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. हा गौरवाचा क्षण जिल्हा परिषद बागेत अप्पाश्री मित्रपरिवार व पत्रकार कृती समिती यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी अॅड. विक्रम कसबे, पत्रकार डी.डी.पांढरे,पत्रकार असलम नदाफ, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष हजरत(भाई )शेख व RTI कार्यकर्ते बापू ताज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे,वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रियाज(भाई) सय्यद,दैनिक शिव-निर्णयचे संपादक अनिल शिराळकर,श्रीराम सेनेचे अध्यक्ष सिद्धराम नांदर्गी, भाजप युवा कामगार मोर्चाचे नितीन करजोळे यांचा समावेश होता. तसेच पत्रकारितेतील मान्यवरांचा उत्स्फू...

पंढरपूर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांची पत्रकार परिषद.

Image
प्रतिनिधी – सोलापूर पंढरपूर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस ग्रामीण विभागातर्फे ग्रामीण मुख्यालयातील संवाद हॉल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर प्रमुख उपस्थित होते. या परिषदेत आषाढी वारीदरम्यान ग्रामीण भागातील पथकांचे नियोजन, सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांनी केले.प्रसंगी पत्रकार कृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व प्रितम यावलकर यांचा टोपी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, पत्रकार सैफन शेख, युनूस अत्तार, अकबर शेख, विजयकुमार उघडे, सिद्धार्थ भडकुंबे, राम हुंडारे, नितीन करजोळे, नांदर्गी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीने गौरव.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  पंढरपूर आषाढी वारी २०२५ दरम्यान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजन आणि वारकऱ्यांसाठी अंमलात आणलेल्या सुसंगत सेवांबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा ‘पत्रकार कृती समिती’व आप्पाश्री लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.या वेळी आयोजित कार्यक्रमात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल,बुके व विठ्ठल-रुक्माईची प्रतिमा देऊन जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव केला. वारी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था आणि वारकऱ्यांना दिलेली तत्पर मदत याबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.कार्यक्रमात बोलताना समिती सदस्यांनी सांगितले की, “या वर्षी जिल्हा प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे वारी अत्यंत शांततापूर्ण, सुगम आणि सुरक्षित वातावरणात पार पडली. याचे श्रेय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला जाते.” जिल्हाधिकारी यांनी यावेळी आपल्या मनोगतात म्हटले की,“वारी म्हणजे फक्त एक धार्मिक यात्रा नव्हे, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. हा सन्मान म्हणजे संपूर्ण प्रशासन आणि पथकासाठी प्रेरणादायी आहे.” यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहि...

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेमधील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट         अक्कलकोट तालुक्यातील गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रत्येक पालकांनीही आपल्या विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या यशस्वी होण्यासाठी अधिक संधी द्यावी असे आवाहन करुन  अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असल्याचे प्रतिपादन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी केले. नुकतेच भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेमधील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते येथील पंचायत समिती सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या प्रसंगी प्रथमेश इंगळे बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रथमेश इंगळे आणि तहसीलदार विनायक मगर तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक व संचालक निसार शेख उपस्थित होते. यावेळी अक्कलकोट तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग, मार्गदर्शक शिक्षक व बक्षीस पात्र विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षण प्रे...

पंढरपूर आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनासाठी मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांचा 'पत्रकार कृती समितीच्या' वतीने गौरव.

Image
प्रतिनिधी-सोलापूर यंदाच्या आषाढी वारीतील प्रभावी आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा पत्रकार कृती समिती व आप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच आषाढी वारी असूनही, त्यांनी संपूर्ण यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवून कोणतीही तक्रार उद्भवू न देता वारकऱ्यांची सेवा केली. "वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलसेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने एकात्मिकपणे काम करत यंदाची वारी यशस्वी केली. वारीदरम्यान आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्यावर मोठी जबाबदारी असते. संतांच्या पालख्यांच्या मार्गावर लाखो भाविकांची सोय, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला.जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक पातळीवर योग्य समन्वय साधत प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे यंदाची वारी कोणतीही अडचण न निर्माण करता शांततेत पार पडली. यामुळेच मुख्याध...

दुधनी येथील विविध विकास कामासाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांना रिपाइं तर्फे साकडे.

Image
  प्रतिनिधी-अक्कलकोट     अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी)दि.१३ अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील विविध विकास कामासाठी निधी उपलब्द करुन देण्यासाठी अक्कलकोटच्या आमदार मा.सचिन कल्याणशेट्टी यांना अक्कलकोट रिपाइं(आठवले गट)च्या वतीने एका निवेदनाद्वारे केली आहे.        रिपाइंचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी व मु आ दुधनी शहर अध्यक्ष महेदिमिया जिडगे यांच्या शिष्टमंडळ अक्कलकोट येथील सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या संपर्क कार्यालयात आ.कल्याणशेट्टी यांच्या भेट देऊन विविध विकास कामाचे लेखी निवेदन देण्यात आली आहे.      विकासकामांचे स्वरूप अशे आहे की, १) नियोजित बुध्दविहार जागेत बुद्धविहार बांधकामासाठी,१,००,००,०००,  २) बौध्द समाज बांधवांसाठी स्मशान भूमी कंपाऊंडवालसाठी  १०,००,००० ३)रेल्वे स्टेशन येथील हावशेट्टी प्ल्याट येथील सोमण्णा ठक्का घर ते शेवटच्या प्लॉट पर्यंत कांक्रीट रस्त्यासाठी१०,००,०००,व ४) बुध्दनगर येथे श्री लक्ष्मी मंदीर सभामंटपा साठी१०,००,००० असे  एकूण आवश्यक असलेल्य...

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.

Image
अक्कलकोट/प्रतिनिधी दुधनी येथील आमचे बौध्द समाज जे कामें सुचवतील ते प्राधान्याने करु.असे प्रतिपादन दुधनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अप्पु उर्फ सातलिंगप्पा परमशेट्टी यांनी व्यक्त केली आहे.          दुधनी रेल्वे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन स्लॅप चे नुकत्याच पूजन करण्यात आली.यावेळी दुधनी कृ उ बा समितीचे सभापती श्री सातलिंगप्पा उर्फ अप्पु(मालक)परमशेट्टी हे बोलत होते,ते पुढे म्हणाले की,विकास रत्न विद्यमान लाडके आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण समाज बांधवांचे कामे करणार असून त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.          याप्रसंगी स्वामी समर्थ सूत मिलचे माजी संचालक बसवराज हौदे,प्रगतीशील शेतकरी युवा नेते शंकर भांजे यांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी रिपाइं सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,मोरया कंट्रक्शनचे कॅंट्रॅक्टर अशोक राठोड,समाजाचे ज्येष्ट नागरीक,सातलिंगप्पा गायकवाड,नामदेव बनसोडे,जालिंदर शिंगे,महेंदिमिंया जिडगे,इंजिनिअर माने,सुप्रवायजर स्वामी,गौ...

डॉ. पल्लोलु यांचा आसादे फाउंडेशनतर्फे सत्कार

Image
प्रतिनिधी – सोलापूर सोलापूर महापालिकेच्या सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदी डॉ. पल्लोलु वाय.एच. यांची नुकतीच नियुक्ती झाली. या निवडीबद्दल त्यांचा आसादे फाउंडेशनचे मा. राजुअण्णा आसादे यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. डॉ. पल्लोलु हे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अभ्यासू, प्रामाणिक आणि होतकरू अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात मनपा प्रशासनाने त्यांच्यावर केली कारवाई ही नियमबाह्य व कार्यक्षेत्राबाहेरील असल्याचे ठरले होते. त्यामुळे सदर कारवाई शिथिल करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार, उपायुक्त आरोग्य मा. आशिष लोकरे व आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या शिफारसीवरून पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली.या निमित्ताने समाजसेवा, दानशूर वृत्ती आणि सामाजिक संस्थांना सातत्याने मदत करणाऱ्या आसादे फाउंडेशनतर्फे डॉ. पल्लोलु यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी मा. पॉल दयावरकोंडा (MPW) आणि मा. विकास राठोड उपस्थित होते.

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजयराजेभोसले यांचा उद्या नागरी सत्कार.

Image
प्रतिनिधी – अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार आणि मानपत्र प्रदान समारंभ रविवार, १३ जुलै रोजी अक्कलकोटमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली.जन्मजयराजे भोसले यांनी अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि भाविकांसाठी केलेल्या कार्यामुळे अक्कलकोटचे नाव राज्यातच नव्हे तर परदेशातही पोहोचवले आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत अलीकडेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शरदराव फुटाणे असणार आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, तसेच अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भ...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी चैताली क्षीरसागर यांची नियुक्ती

Image
सोलापूर/प्रतिनिधी  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला असून, त्याअंतर्गत महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी चैताली क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आदेशानुसार, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली ताई चाकणकर यांच्या नेतृत्वात तसेच शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी गुरुवारी दोन नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. त्यामध्ये चैताली क्षीरसागर यांना शहर उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. नियुक्तीपत्र संतोष पवार आणि जुबेर बागवान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यानंतर त्यांनी तसेच संगीता जोगधनकर यांनी क्षीरसागर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात -मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम.

Image
१५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ११२३ पैकी ३५ ग्रामपंचायतीची निवड पध्दतीने तपासणी. प्रतिनिधी -सोलापूर सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत सर्व तयारी पुर्ण झाली आहे.सर्व गावात स्वच्छतेचे सातत्य टिकविण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत.जिल्ह्याने यापुर्वी देखील या अभियानात चांगली कामगिरी केली आहे.यासाठी १ हजार गुणांची तयारी करणेत आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.   याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत घटकनिहाय तयारी करणेत आली आहे.यासाठी सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची टीम कार्यरत आहे.येत्या १५ ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ११२३ पैकी ३५ ग्रामपंचायतीची निवड पध्दतीने तपासणी केली जाणार आहे.गाव कोणते निवडायचे ते केंद्र शासनाची समिती एक दिवस अगोदर यादी तयार करते. केंद्राच्या पथकाकडून होणार तपासणी... जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमा अंतर्गत सर्व ग्रामपंचायती सहभागी होत असतात.  जिल्ह्यातील सर्व ग्रामप...

नेताजी(भाऊ)खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे वह्यांचे वाटप.

Image
प्रतिनिधी-सोलापूर उळे गावचे उपसरपंच तसेच सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेताजी (भाऊ) खंडागळे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत जिल्हा परिषद शाळा बोरामणी, मोहोळकर तांडा, चिरका वस्ती आणि मलिक तांडा येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमादरम्यान नेताजी भाऊ खंडागळे यांचा संबंधित शाळांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या. कार्यक्रमावेळी गावचे सरपंच राज साळुंखे, उपसरपंच वैभव हलसगे, ग्रामपंचायत सदस्य आकाश माशाळे, शाळेचे मुख्याध्यापक बनजगोळे सर, केंद्रप्रमुख व्हनमाने सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र हास्य जत्रेचे कलाकार स्वामीचरणी नतमस्तक.

Image
महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांचे देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट             महाराष्ट्र हास्य जत्रेचे कलाकार येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात स्वामीचरणी नतमस्तक होत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी महाराष्ट्र हास्य जत्रेचे कलाकार समीर चौगुले, ओंकार राऊत, अरुण कदम, वनिता खरात, पृथ्विक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर, प्रभाकर मोरे, शिवाली परब या सर्व कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना कलाकार अरुण कदम यांनी आम्हा सर्व कलाकारांची अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांवर अफाट श्रध्दा आहे. श्री स्वामी समर्थाच्या कृपेनेच महाराष्ट्राची हास्य जत्रा युनिट लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.  आजच्या तणावपुर्ण मानवी जीवनशैलीत लोकांचे व अक्कलकोटकरांचे मनोरंजन करण्याचे परमभाग्य आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा संकल्पनेतून लाभले असल्याने स्वामी कृपेचे आम्ही सर्व अत्यंत मनोभावे ऋणी असल्याचे मनोगत व्यक...

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत IDH हॉस्पिटल आणि सिव्हिल UPHC येथे डॉ. पल्लोलु वाय.एच. यांची वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत IDH हॉस्पिटल तसेच सिव्हिल प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे डॉ. पल्लोलु वाय.एच. यांची वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकतेच पदभार स्वीकारला असून, त्यानिमित्ताने SMC IDH & Civil UPHC च्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचा हारतुरे व बुके देऊन सत्कार केला. या प्रसंगी उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

सोमपा सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु.वाय.एच व नवनिर्वाचित पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांना 'च्यामारी'नामक पुस्तक सप्रेम भेट.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर पोलीस आयुक्तालयात नुकताच एक विशेष स्नेहप्रसंग अनुभवता आला. क्राईम ब्रँचचे माजी उपायुक्त व सध्या SRPF (राज्य राखीव पोलीस बल) मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून बदली झालेले समुपदेशक डॉ. दिपाली काळे मॅडम यांचा सोलापूर येथे निरोप समारंभ झाला.त्याच वेळी डॉ. पल्लोलु.वाय.एच यांची सोलापूर महानगरपालिका सिव्हिल नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून झालेली नवीन नियुक्ती लक्षात घेता, नामवंत लेखक, मराठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता डॉ. प्रमोद काळे लिखित "च्यामारी" हे पुस्तक त्यांनी सप्रेम भेट दिले. या भेटीबरोबरच रुग्णसेवेसाठी त्यांनी मन:पूर्वक शुभेच्छाही दिल्या. याच कार्यक्रमात सोलापूर क्राईम ब्रँचच्या नव्या पोलीस उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या मा. अश्विनी पाटील मॅडम यांनाही "च्यामारी" हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले व त्यांच्या नवीन कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.