अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजयराजेभोसले यांचा उद्या नागरी सत्कार.

प्रतिनिधी – अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा नागरी सत्कार आणि मानपत्र प्रदान समारंभ रविवार, १३ जुलै रोजी अक्कलकोटमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज, अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी दिली.जन्मजयराजे भोसले यांनी अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि भाविकांसाठी केलेल्या कार्यामुळे अक्कलकोटचे नाव राज्यातच नव्हे तर परदेशातही पोहोचवले आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत अलीकडेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शरदराव फुटाणे असणार आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, तसेच अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे उपाध्यक्ष अमर शिंदे, संचालक बाळासाहेब मोरे, राजीव माने, तानाजी चव्हाण, सुधाकर गोंडाळ, संतोष फुटाणे-जाधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर