सोलापूरमध्ये टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन.वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु वाय.एच
प्रतिनिधी-सोलापूर
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत सोलापूर शहर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, सिव्हिल UPHC आणि बापुजी नगर हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे नेतृत्व वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय.एच. सर यांनी केले.
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत सोलापूर शहर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, सिव्हिल UPHC आणि बापुजी नगर हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे नेतृत्व वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय.एच. सर यांनी केले.
शिबिरात एकूण 69 रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये 33 संशयित रुग्णांची छातीचा क्ष-किरण (X-ray) तपासणी करण्यात आली असून 9 संशयित रुग्णांचे थुंकी नमुने (sputum sample) संकलित करण्यात आले आहेत. रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचारही करण्यात आले.
शिबिरामध्ये डॉ. पल्लोलु सर यांनी टीबी रोगाचे कारणे, लक्षणे, तपासण्या, औषधोपचार व महापालिकेच्या वतीने मिळणाऱ्या मोफत सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांना TB STTS बगाडे अनिल सर व TB HV मनोज सोनकांबळे यांनी सहकार्य केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी PHN कविता पवार, ANM शिल्पा वानोळे, अरणोदय जंगम, कोमल सुतार, शिवकन्या सानप, शिपाई मा.पाँल दयावरकोंडा, आशा मार्था डल्लु, नंदीनी पल्लोलु, रेणुका बोल्ली, नरसमा तल्लाटी, कांचन माने, प्रीती भोसले यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच नवशक्ती तरुण मंडळ बापुजी नगरचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले.
टीबीमुक्त भारतासाठी समाजाच्या सर्व स्तरांतील सहभाग आणि जनजागृती आवश्यक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240