काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची निवड.

प्रतिनिधी-सोलापूर
विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची अखेर सात महिन्यानंतर निवड जाहीर झाली. अक्कलकोटचे ज्येष्ठ नेते सातलिंग अण्णाराव शटगार यांची या पदावर सातलिंग शटमार निवड प्रसिद्धीप्रमुख, झाली. वरिष्ठ उपाध्यक्ष या जवाबदाऱ्या सांभाळल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीवरुन शटगार यांना हे प्रमोशन मिळाले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा मंगळवारी रात्री करण्यात
आली. त्यात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीमध्ये सुशिलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे. लोकसभेत सोलापूरमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले. पण विधानसभेला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे तत्कालिन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. दरम्यानच्या काळात पक्षातील
अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षातील मरगळ झटकण्यासाठी व संघटन वाढवण्यासाठी नव्या दमाच्या जिल्हाध्यक्षाची गरज होती, ती जबाबदारी आता शटगार यांच्यावर देण्यात आली.
यावेळी सुदर्शन(बप्पा)आवताडे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस यांनीही शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर