"एक राखी सैनिक बांधवांसाठी"-सह्याद्री फाउंडेशनचा अनोखा उपक्रम.

प्रतिनिधी -सोलापूर,
कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सह्याद्री फाउंडेशनतर्फे 
“एक राखी सैनिक बांधवांसाठी” हा प्रेरणादायी उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी आपल्या प्रेमाच्या, अभिमानाच्या आणि कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत हातांनी बनवलेल्या राख्या थेट सीमेवर लढणाऱ्या आपल्या वीर जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.
सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. नेताजी भाऊ खंडागळे यांनी या उपक्रमाची घोषणा करत सर्व शाळांतील विद्यार्थिनींना राखी पाठवण्यास आवाहन केले.
राखी पाठविण्याची अंतिम तारीख: १ ऑगस्ट २०२५, शुक्रवार
विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांना विनंती करण्यात येते की स्थानिक सह्याद्री फाउंडेशन प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर