पंढरपूर आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनासाठी मुख्याधिकारी कुलदीप जंगम यांचा 'पत्रकार कृती समितीच्या' वतीने गौरव.

प्रतिनिधी-सोलापूर
यंदाच्या आषाढी वारीतील प्रभावी आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा पत्रकार कृती समिती व आप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच आषाढी वारी असूनही, त्यांनी संपूर्ण यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवून कोणतीही तक्रार उद्भवू न देता वारकऱ्यांची सेवा केली.
"वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलसेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने एकात्मिकपणे काम करत यंदाची वारी यशस्वी केली.
वारीदरम्यान आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्यावर मोठी जबाबदारी असते. संतांच्या पालख्यांच्या मार्गावर लाखो भाविकांची सोय, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला.जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक पातळीवर योग्य समन्वय साधत प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे यंदाची वारी कोणतीही अडचण न निर्माण करता शांततेत पार पडली. यामुळेच मुख्याधिकारी जंगम यांचा शाल बुके व पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल- रुक्माईची प्रतिमा देऊन सत्कार करत पत्रकार कृती समितीने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहिम पठाण, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, वरिष्ठ पत्रकार सैफन शेख, 'जय हो' चे संपादक विजयकुमार उघडे, कार्याध्यक्ष शब्बीर मनियार, सहखजिनदार युनूस अत्तार, तसेच रफिक देगनाळकर, कलिम पटेल, अकबर शेख, सिध्दार्थ भडकुंबे, युवराज वाघमोडे, इरफान मंगलगिरी, इक्बाल बागमारु,राम हुंडारे, प्रसाद ठक्का,उपेंद्र गायकवाड,गणेश भालेराव,नुरअहमद तांबोळी,सिकंदर शेतसंदी, इरफान मैंदर्गी,गिरमल्ला गुरव,सिद्धाराम नंदर्गी,गौतम माने,प्रशांत दिलपाक,नितीन करजळे,साजिद मकानदार आणि इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.