आषाढी यात्रेत पंढरपूरसह सहा जिल्ह्यांत दोन कोटी भाविक सहभागी – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

प्रतिनिधी -पंढरपूर, 

यंदाच्या आषाढी वारीत पंढरपूरसह पुणे, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यांतील पालखी मार्गांवर एकूण दोन कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला, अशी माहिती ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.पंढरपूर शहरातील श्रीयश पॅलेस येथे आयोजित आषाढी यात्रा २०२५ कृतज्ञता मेळाव्या प्रसंगी मंत्री गोरे बोलत होते. या वेळी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील अधिकारी, सरपंच, कर्मचारी, तसेच वारकरी सेवा करणारे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यत्रणांचे उत्तम नियोजन व कार्य कौतुकास्पदया 

वेळी मंत्री गोरे म्हणाले, पालखी मार्गावरील गावागावांतून, तसेच पंढरपूर नगरीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. पंढरपूरमध्ये प्रत्यक्ष २५ लाख भाविक आले, तर दीड कोटीहून अधिक लोकांनी पालखी मार्गावर संतांच्या दर्शनाचा लाभ घेतला.”कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, पुणेचे सीईओ गजानन पाटील, साताऱ्याच्या सीईओ याशनी नागराजन, तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पोलिस व प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

निर्मल वारी’, ‘महास्वच्छता अभियान’ यशस्वी

मंत्री गोरे यांनी सांगितले की, “११ हजार शौचालयांची व्यवस्था, जर्मन हॅंगर सुविधा, मुख्यमंत्री वारकरी निवारा, तसेच पाच तासांमध्ये व्हीआयपी मुक्त दर्शन अशा अनेक योजनांमुळे यंदाची वारी अधिक व्यवस्थित झाली. रांगेतील भाविकांना अन्न, चहा, नाश्ता पुरविण्यात आला. या सेवेमुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आणि हेच माझे खरे समाधान आहे, असे भावुक होत मंत्री गोरे यांनी सांगितले.”
स्वच्छतादूतांचा विशेष सन्मान
मेळाव्याची सुरुवात स्वच्छतादूतांचा सन्मानाने करण्यात आली. वाखरीचे जितेंद्र पोरे, भारूडकार चंदाताई तिवाडी, गाडगेबाबा वेशातील नागटिळक, कलाकार दत्तात्रय येडवे व संजय बिदरकर यांचा सन्मान करताना उपस्थित भारावून गेले.
अन्य मान्यवरांचा सहभाग या कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अधिकारी व विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर सचिन जाधव यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी विकास काळुंखे, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी शहाजहान तांबोळी, वरिष्ठ सहायक महेश वैद्य, संदीप अटकळे, माउली साळुंखे, कमलेश खाडे, कोल्हे यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर