पोलीस उपनिरीक्षक पदभार स्विकारल्यानंतर महेश इंगळे यांच्या हस्ते पो.उ.नि.दत्तात्रय घंटे यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार
![]() |
पो.उ.नि.दत्तात्रय घंटे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सुनिल कटारे, बंडोपंत घाटगे व अन्य दिसत आहेत. |
घंटे हे आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने पोलीस खात्याची सेवा करीत आहेत. त्यांची अनुशासक कार्यप्रणाली ही त्यांच्या सेवेची जमेची बाजू आहे. त्यांनी अक्कलकोट येथे असताना पोलीस खात्यातील सेवेच्या माध्यमातून वटवृक्ष मंदीरात निर्मळ मनाने उदात्त सेवा दिली आहे. त्यांच्या या सेवेचे फलीत म्हणजे पोलीस खात्यात त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर झालेली पदोन्नती आहे. या माध्यमातून दत्तात्रय घंटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी झालेली पदोन्नती म्हणजे घंटे यांच्या निर्मळ सेवेचे फळ असल्याचे प्रतिपादन येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. नुकतेच पाकणी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र येथे कार्यरत असलेल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घंटे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती होवून पदाचा पदभार स्विकारल्यानंतर दत्तात्रय घंटे यांनी सर्वप्रथम आपले आराध्य दैवत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दत्तात्रय घंटे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सन्मान करुन घंटे यांच्या पुढील सेवेस शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश इंगळे बोलत होते.
या प्रसंगी बोलताना पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय घंटे यांनी माझ्या पोलीस खात्यातील दिर्घ सेवेत मंदीर समितीचे प्रमुख व आमच्या श्रध्दास्थानी असलेले महेश इंगळे यांनी आपल्याला विवीध माध्यमातून वेळोवेळी मौलिक असे सहकार्य केले व करीत आहेत. आजही माझ्या पदोन्नती नंतर त्यांनी येथे स्वामींचे कृपावस्त्र देवून सन्मान केल्यानंतर त्यांच्या शुभेच्छा व प्रेम सदैव आपल्या पाठीशी असल्याची प्रचिती आली असल्याचे सांगून या पुढेही त्यांचे मोलाचे साथ आपल्या पाठीशी रहावे अशा शुभकामना व्यक्त केल्या. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सुनिल कटारे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बंडोपंत घाटगे, बसवराज नागणसुरे, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, खाजप्पा झंपले इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240