दुधनी येथील विविध विकास कामासाठी आ.सचिन कल्याणशेट्टी यांना रिपाइं तर्फे साकडे.

 
प्रतिनिधी-अक्कलकोट
    अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी)दि.१३ अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील विविध विकास कामासाठी निधी उपलब्द करुन देण्यासाठी अक्कलकोटच्या आमदार मा.सचिन कल्याणशेट्टी यांना अक्कलकोट रिपाइं(आठवले गट)च्या वतीने एका निवेदनाद्वारे केली आहे.
       रिपाइंचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी व मु आ दुधनी शहर अध्यक्ष महेदिमिया जिडगे यांच्या शिष्टमंडळ अक्कलकोट येथील सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या संपर्क कार्यालयात आ.कल्याणशेट्टी यांच्या भेट देऊन विविध विकास कामाचे लेखी निवेदन देण्यात आली आहे.
     विकासकामांचे स्वरूप अशे आहे की,
१) नियोजित बुध्दविहार जागेत बुद्धविहार बांधकामासाठी,१,००,००,०००, 
२) बौध्द समाज बांधवांसाठी स्मशान भूमी कंपाऊंडवालसाठी  १०,००,०००
३)रेल्वे स्टेशन येथील हावशेट्टी प्ल्याट येथील सोमण्णा ठक्का घर ते शेवटच्या प्लॉट पर्यंत कांक्रीट रस्त्यासाठी१०,००,०००,व
४) बुध्दनगर येथे श्री लक्ष्मी मंदीर सभामंटपा साठी१०,००,००० असे 
एकूण आवश्यक असलेल्या निधी रक्कम रुपये१,३०,००,०००
       वरील सर्व कामे सर्व मान्य नागरिकांसाठी अत्यंत गरज असल्याने प्रामुख्याने मंजूर करण्यात यावे.अशी मागणी रिपाइं(आठवले गट)च्या वतीने केली आहे.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर