श्रावण सोमवार व नागपंचमी निमित्ताने अकोले काटी येथे महाप्रसादाचे आयोजन; समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

प्रतिनिधी-उ. सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी येथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारस व नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन समता परिषद रणरागिणी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष सौ. उमा नागेश अकोलकर माळी यांनी केले होते.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभली ती संत शिरोमणी सावता माळी महाराजांचे वंशज आणि अरण तीर्थक्षेत्र चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. सावता महाराज वसेकर यांची. त्यांच्यासोबत समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भंडारे, नागनाथ मंदिर देवस्थानचे पुजारी गोकुळ मारुती ढगे महाराज, सचिन महाराज, तालुका अध्यक्ष बबन माळी, विद्यमान उपसरपंच सतीश लामकाने, अनंत अकोलकर, जयश्री माळी, संध्या माळी तसेच अकोले काटी येथील ग्रामस्थ व महिला कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.या वेळी एकत्रितपणे महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रमात नुकतीच निवड झालेल्या समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, संत शिरोमणी सावता माळी महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर तसेच बापूसाहेब भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. सौ. उमा अकोलकर व सर्व कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून सामाजिक कार्यासाठी "आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत" असा विश्वास व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर