नियमीत स्वामी नामस्मरणाने जीवनला नवचैतन्य प्राप्ती - जेष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल.
![]() |
जेष्ठ मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश मालक इंगळे, पो.नि.राजेंद्र टाकणे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत. |
येथील वटवृक्ष निवासी स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त आहोत. वर्तमानकाळात स्वामींची लिला व चमत्काराविषयी शब्दांची संरचना कमीच आहे. त्यांच्या महतीविषयी बोलावे तितके कमीच. त्यांचे चरित्र व कार्य शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे असून माझ्या सारख्या स्वामी भक्ताला आलेल्या अनुभवातून सांगायचे झाल्यास स्वामींच्या नित्य नामस्मरणाने जीवनातील प्रत्येक कामाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन बनतो. या माध्यमातून नियमीत स्वामी नामस्मरणाने माझ्या उतारवयातील जीवनलाही नवचैतन्य प्राप्ती लाभत आहे असे मनोगत मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केल्या. त्या नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिनेत्री अलका कुबल यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी अभिनेत्री अलका कुबल बोलत होत्या. यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री अलका कुबल या एक मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ आघाडीच्या नायिका आहेत. स्वामी भक्ती जशी ते आत्मीयतेने करतात, तसेच आपले चित्रपटसृष्टीतील काम ही अत्यंत आत्मियतेने करतात म्हणूनच त्यांना मराठी चित्रसृष्टीमध्ये मानाचे स्थान आहे. त्यांची अभिनय क्षमता असेच वारंवार बहरत जावी याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून स्वामींचे कृपा आशीर्वाद व वस्त्र दिले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पो.नि.राजेंद्र टाकणे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, संजय पवार, गिरीश पवार इत्यादीसह भाविक भक्त उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240