प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेमधील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

प्रतिनिधी-अक्कलकोट
        अक्कलकोट तालुक्यातील गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रत्येक पालकांनीही आपल्या विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या यशस्वी होण्यासाठी अधिक संधी द्यावी असे आवाहन करुन अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत असल्याचे प्रतिपादन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी केले. नुकतेच भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेमधील ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते येथील पंचायत समिती सभागृहात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रथमेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रथमेश इंगळे आणि तहसीलदार विनायक मगर तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक व संचालक निसार शेख उपस्थित होते. यावेळी अक्कलकोट तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग, मार्गदर्शक शिक्षक व बक्षीस पात्र विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षण प्रेमी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल डावरे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील राठोड यांनी केले.
फोटो ओळ - विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रथमेश इंगळे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी, तहसीलदार विनायक मगर, युवा उद्योजक व संचालक निसार शेख व अन्य दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर