पंढरपूर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांची पत्रकार परिषद.

प्रतिनिधी – सोलापूर
पंढरपूर आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस ग्रामीण विभागातर्फे ग्रामीण मुख्यालयातील संवाद हॉल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर प्रमुख उपस्थित होते.या परिषदेत आषाढी वारीदरम्यान ग्रामीण भागातील पथकांचे नियोजन, सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) यांनी केले.प्रसंगी पत्रकार कृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व प्रितम यावलकर यांचा टोपी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पत्रकार कृती समितीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, पत्रकार सैफन शेख, युनूस अत्तार, अकबर शेख, विजयकुमार उघडे, सिद्धार्थ भडकुंबे, राम हुंडारे, नितीन करजोळे, नांदर्गी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.