डॉ. पल्लोलु यांचा आसादे फाउंडेशनतर्फे सत्कार

प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर महापालिकेच्या सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदी डॉ. पल्लोलु वाय.एच. यांची नुकतीच नियुक्ती झाली. या निवडीबद्दल त्यांचा आसादे फाउंडेशनचे मा. राजुअण्णा आसादे यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. पल्लोलु हे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अभ्यासू, प्रामाणिक आणि होतकरू अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात मनपा प्रशासनाने त्यांच्यावर केली कारवाई ही नियमबाह्य व कार्यक्षेत्राबाहेरील असल्याचे ठरले होते. त्यामुळे सदर कारवाई शिथिल करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार, उपायुक्त आरोग्य मा. आशिष लोकरे व आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या शिफारसीवरून पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली.या निमित्ताने समाजसेवा, दानशूर वृत्ती आणि सामाजिक संस्थांना सातत्याने मदत करणाऱ्या आसादे फाउंडेशनतर्फे डॉ. पल्लोलु यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी मा. पॉल दयावरकोंडा (MPW) आणि मा. विकास राठोड उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर