राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी चैताली क्षीरसागर यांची नियुक्ती

सोलापूर/प्रतिनिधी 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीला वेग दिला असून, त्याअंतर्गत महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी चैताली क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आदेशानुसार, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली ताई चाकणकर यांच्या नेतृत्वात तसेच शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी गुरुवारी दोन नव्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. त्यामध्ये चैताली क्षीरसागर यांना शहर उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले.
नियुक्तीपत्र संतोष पवार आणि जुबेर बागवान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यानंतर त्यांनी तसेच संगीता जोगधनकर यांनी क्षीरसागर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर