महाराष्ट्र हास्य जत्रेचे कलाकार स्वामीचरणी नतमस्तक.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कलाकारांचे देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
प्रतिनिधी-अक्कलकोट
            महाराष्ट्र हास्य जत्रेचे कलाकार येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात स्वामीचरणी नतमस्तक होत श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी महाराष्ट्र हास्य जत्रेचे कलाकार समीर चौगुले, ओंकार राऊत, अरुण कदम, वनिता खरात, पृथ्विक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर, प्रभाकर मोरे, शिवाली परब या सर्व कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना कलाकार अरुण कदम यांनी आम्हा सर्व कलाकारांची अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांवर अफाट श्रध्दा आहे. श्री स्वामी समर्थाच्या कृपेनेच महाराष्ट्राची हास्य जत्रा युनिट लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 


आजच्या तणावपुर्ण मानवी जीवनशैलीत लोकांचे व अक्कलकोटकरांचे मनोरंजन करण्याचे परमभाग्य आम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्रा संकल्पनेतून लाभले असल्याने स्वामी कृपेचे आम्ही सर्व अत्यंत मनोभावे ऋणी असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब घाटगे, अंकूश केत, सुनिल पवार, दर्शन घाटगे, खाजप्पा झंपले, गिरीश पवार, अमोल पाटील, आदीत्य गवंडी, सागर गोंडाळ, धनराज स्वामी, ऋषिकेश लोणारी, विपूल जाधव, डॉ.हिरण्णा पाटील, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
 

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.