सोलापूरच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ – सालार टोळीवर ‘मोक्का’खाली कारवाई.

प्रतिनिधी-सोलापूर
हरातील कुख्यात सालार टोळीवर अखेर पोलिसांनी कडक कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मौलाना आझाद चौकात घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर, टोळीविरोधात संघटित गुन्हेगारीचे ठोस पुरावे सापडल्याने ही कारवाई करण्यात आली.
टनेचा तपशील-दि. 2 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 वाजता, मौलाना आझाद चौक, नई जिंदगी परिसरात, सोहेल रमजान सय्यद या युवकाने उसनवारी परत मागितली असता फैसल सालारसह टोळीतील इतरांनी त्याच्यावर हल्ला केला. फैसलने चाकू दाखवून धमकी दिली, “मैं इधर का भाई हूँ… कोई आगे आया तो खल्लास कर दूंगा!” म्हणत पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. बचाव करताना फिर्यादीच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली तर नागरिकांनी घरांमध्ये आसरा घेतला. पोलिसांनी IPC व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
टोळीचा इतिहास-2015 पासून सोलापुरात सक्रिय असलेल्या सालार टोळीमध्ये फैसल सालार, जाफर शेटे, टिपू सालार, पापड्या, अक्रम पैलवान आणि वसीम उर्फ मुकरी यांचा समावेश आहे. खंडणी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, धमकी अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आढळून आला आहे.
मोक्कांतर्गत कारवाई-पोलिस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांनी 21 जुलै 2025 रोजी मोक्का कायदा 1999 अंतर्गत कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) लागू करत टोळीविरोधात मोठी कारवाई मान्य केली. त्यामुळे या टोळीला जामीन मिळण्याची शक्यता कमी असून, अधिक कठोर शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.
तपास प्रगतीत-या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने करत आहेत. टोळीतील उर्वरित सदस्यांचा शोध सुरु असून लवकरच अधिक अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हेगारीला आळा-या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या निर्णायक भूमिकेमुळे सोलापूर शहरात कायदा-सुव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर