संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम
प्रतिनिधी -सोलापूर
महाराष्ट्राला तर्कशुद्ध विचार व स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि सारथी युथ फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर तलाव परिसरात ही मोहीम पार पडली.

आपदा मित्र-सखी व सारथी युथ फाउंडेशनचे स्वयंसेवकांनी मंदिरासमोरील मोकळे पटांगण, पार्किंग परिसर तसेच बोट चालविण्याच्या सरावासाठी वापरला जाणारा भाग स्वच्छ केला. तलाव परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, या भूमिकेतून टीमने रबर बोटीच्या सहाय्याने तलावातील प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, चहाचे कागदी कप, वाळलेली पाने, नारळ, निर्माल्य व इतर विविध प्रकारचा कचरा बाहेर काढला. बोटीच्या साहाय्याने सिद्धेश्वर तलाव स्वच्छ करण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला. या कार्यासाठी सिद्धेश्वर मंदिर समितीने सहकार्य केले.
मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांनी उपक्रमाचे कौतुक करत मंदिर परिसरात अशा स्वच्छता मोहिमा वारंवार राबविण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
यावेळी सारथी युथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे, कोअर कमिटी सदस्य प्रसाद अतनुरकर, शहाजी ढोले, बजरंग होटकर, गुरुनाथ ताटे, सागर धप्पाधुळे तसेच आपदा मित्र-सखी आणि फाउंडेशनचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240