सोलापूरात नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
प्रतिनिधी -सोलापूर, दि. १३ फेब्रुवारी २०२६
सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटाला पालक व उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी होते. प्रमुख अतिथी म्हणून ख्रिस्तोफर रेनेहान (व्यवस्थापकीय संचालक, ब्लू 3 यूके लिमिटेड), मार्क बेले (संचालक, गिव एनर्जी लिमिटेड यूके), डॉ. माधवी रायते (माजी अधिष्ठाता, अश्विनी मेडिकल ग्रामीण महाविद्यालय, सोलापूर), चंद्रिकाताई चौहान (अध्यक्षा, उद्योगवर्धिनी, सोलापूर), नूतन नगरसेविका रंजिता चाकोते, सचिवा वर्षाताई विभुते, शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, सल्लागार डॉ. बंडोपंत पाटील, प्राचार्या रुपाली हजारे, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या स्मिता कुलकर्णी व मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. नागेश अण्णा करजगी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी ख्रिस्तोफर रेनेहान यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रशंसा करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. डॉ. माधवी रायते यांनी लहान विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाचे अभिनंदन केले, तर चंद्रिकाताई चौहान यांनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी केलेल्या सुबक नियोजनाबद्दल शाळेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
प्राचार्या रुपाली हजारे यांनी शैक्षणिक वर्षातील प्रगतीचा आढावा घेत शाळेची गुणवत्ता सातत्याने उंचावत असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख सादर करत त्यांनी पालकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी यांनी शाळेच्या स्थापनेपासून झालेल्या विस्ताराचा उल्लेख करत भविष्यात सोलापूरातील विद्यार्थ्यांसाठी ‘नागेश करजगी मेडिकल कॉलेज’ सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.
दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी लोकगीते, लोकनृत्य, शेतकरी गीते, लावणी, रिमिक्स गीते, देशभक्तीपर गीते तसेच सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या नंदिध्वज दर्शनाचा देखावा सादर केला. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट सादर करून कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक रंगत आणली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैष्णवी शिंदे, स्नेहल डोके, शौर्या मंठाळकर, दुर्वा आनंदकर, संज्ञा मोहिते, उत्कर्षा जाधव, संस्कृती बिडवे, श्रेया कुसेकर, सोनल कोकटनूर, नव्या गुप्ता, कनक गांधी, आर्या गिराम, ऋचा झरडे, श्रावणी जगताप, पार्श्व पाटील, श्रेयस सावंत, आशिष नरोणे, गणेश शिंदे, सुयश आवताडे, नैतिक दरगड, अमित डोके व अथर्व दोड्याळे या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षिका प्रिसिला असादे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

----------------------------------
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- ९५७९८३८२४०

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240