पोलीस आयुक्तालय सोलापूर तर्फे गायक मोहम्मद अयाज यांचा सन्मान.
![]() |
| सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार,सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,पोलीस उपायुक्त हसन गोहर , पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, गायक मोहम्मद अयाज आदी दिसत आहेत |
पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या वतीने आयोजित स्नेहमेलन व संगीत संध्या कार्यक्रमात सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा सन्मान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आला.
पोलीस आयुक्तालयाच्या सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित या संगीत संध्येत ‘सोलापूर सुरमणी’ तसेच ‘महाराष्ट्राचे महागायक’ विजेते म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद अयाज यांनी आपल्या सुरेल आवाजात एकापेक्षा एक गाणी सादर करत उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मने जिंकली. त्यांच्या दमदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम, डीसीपी विजय कबाडे, डीसीपी हसन गोहर, डीसीपी अश्विनी पाटील, एसपी विजया कुर्री, एसपी राजेंद्र माने, एसीपी मच्छिंद्र पंडित, उदयसिंग पाटील, सोलापूरचे डीन डॉ. जयकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक लकडे तसेच हजारो पोलीस परिवार उपस्थित होते.
हा बहारदार कार्यक्रम सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी मोहम्मद अयाज यांनी सन्मानाबद्दल संपूर्ण पोलीस आयुक्तालयाचे आभार व्यक्त केले.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240