वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सोलापूर महानगरपालिका राज्यात प्रथम.
सोलापूर महानगरपालिकाने “माझी वसुंधरा अभियान 4.0” अंतर्गत भूमि विभागात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवत मानाचा सन्मान प्राप्त केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानगरपालिकेला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई येथे पार पडलेल्या “माझी वसुंधरा अभियान 4.0” सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, पर्यावरण व वातावरण बदल मंत्री सुमित्रा ताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात आला.
सदर सन्मान स्वीकारण्यासाठी महापौर श्री. विनायक कोंडीयाल, उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक स्वप्निल सोलंकर, पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर, गणेश बिराजदार, मल्लु सकठ तसेच वसुंधरा अभियानाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या यशामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची प्रतिक्रिया :
“हरित सोलापूर करण्याच्या दृष्टीने हा सन्मान अत्यंत प्रेरणादायी आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत संपूर्ण टीम तसेच सोलापूरमधील विविध पर्यावरण संस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धनाची कामे करण्यात आली. त्याच कार्याचा आज राज्यस्तरावर गौरव झाला आहे. पुढील काळात हरित सोलापूर अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी सांगितले.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240