छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘मराठा महोत्सव २०२६’मध्ये ‘शिवशंभू शौर्यगाथा’ महानाट्याचा भव्य सोहळा; मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले व किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती.

 कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना श्रीमंत मालोजीराजे भोसले,आ. किसन कथोरे,पोलिस निरीक्षक व अन्य मान्यवर दिसत आहेत.
अक्कलकोट | दि. २५फेब्रुवारी २०२६
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित “मराठा महोत्सव २०२६” अंतर्गत भव्य ऐतिहासिक महानाट्य सोहळा गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले, अक्कलकोट यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्यास विशेष राजेशाही दिमाख लाभला.
सकल मराठा समाज हितवर्धक मंडळ, बदलापूर यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात “शिवशंभू शौर्यगाथा” या ऐतिहासिक महानाट्याचे भव्य सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील पराक्रम, स्वराज्य स्थापनेची गाथा, युद्धप्रसंग आणि राष्ट्रनिष्ठा यांचे प्रभावी दर्शन या नाट्यप्रयोगातून घडले. कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते. संयोजक श्री. अरुण दशरथ चव्हाण (स्वागताध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मा. आमदार किसन कथोरे व महोत्सवाचे स्वागताध्यक्ष श्री. अरुण चव्हाण यांच्या हस्ते राजेंचा सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राजासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचे स्मरण करून तरुण पिढीने इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजकार्यात व राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. आमदार किसन कथोरे यांनीही मराठा समाजाच्या ऐक्याचे आणि सांस्कृतिक जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी नगराध्यक्षा सौ. रुचिता ताई घोरपडे, अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. तेजश्री करंजुळे-पाटील, उपनगराध्यक्षा सौ. प्रियंका दामले, मुख्याधिकारी श्री. मारुती गायकवाड तसेच नगरसेवक व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्य नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा यशस्वी ठरला. “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि कार्यक्रमाची दिमाखदार सांगता झाली.


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.