संवेदनशीलतेचा प्रत्यय:अतनूरकर कुटुंबीयांकडून सुमन कुलकर्णी यांचे देहदान.

प्रतिनिधी | सोलापूर
समाजाप्रती कर्तव्यभावना जपत मानवतेचा सर्वोच्च संदेश देणारी प्रेरणादायी कृती प्रसाद अतनूरकर यांच्या मातोश्री सुमन केशवराव कुलकर्णी (वय ९१) यांनी मरणोत्तर देहदान करून केली. त्यांच्या निधनानंतर अंतिम इच्छेचा सन्मान राखत अतनूरकर कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेत डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
देहदान ही समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व प्रेरणादायी कृती असून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी तिचा मोठा उपयोग होतो. सुमन कुलकर्णी यांच्या या उदात्त निर्णयामुळे समाजात जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ होण्यासोबतच देहदानासारख्या कार्यासाठी अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.कुटुंबीयांनी तत्परतेने पुढाकार घेत संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत देहदानाची प्रक्रिया पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून देहदानाबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचत आहे.सुमन केशवराव कुलकर्णी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या या उदात्त कार्यातून मानवतेचा दीप समाजात सदैव प्रज्वलित राहो, हीच श्रद्धांजली.
-------------------------------------
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments