आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी आंदोलनावर ठाम प्रधान सचिव यांचेशी सकारात्मक चर्चा..!
आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी आंदोलनावर ठाम
प्रधान सचिव यांचेशी सकारात्मक चर्चा..!
मंगळवारी मुख्य सचिव यांचेकडे बैठक
प्रतिनिधी - सोलापूर
प्रधान सचिव यांचेशी सकारात्मक चर्चा..!
मंगळवारी मुख्य सचिव यांचेकडे बैठक
प्रतिनिधी - सोलापूर
मुंबई - आझाद मैदानावर सुरू असलेले पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलन दुसरे दिवशी सुरू ठेवणेत आले आहे.पाच महिने पासून वेतन व प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकी साठी आज प्रधान सचिव पराग जैन यांचे समवेत झालेल्या बैठकीतील चर्चा सकारात्मक ठरली आहे. त्यामुळे उद्या निधी वितरण आदेश सोबत इतर लेखी आश्वासन दिलेनंतर आझाद मैदान सोडणार अशी भुमिका राज्य कृती समितीचे वतीने घेणेत आली. राज्यातील साडेचारशे पेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.याबाबत उद्या १० फेब्रुवारी रोजी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे दालनात प्रधान सचिवांची बैठक होणार आहे.
आज आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलनाचे पार्शवभुमीवर जीटी रूग्णालय परिसरातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात आज प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, जल जीवन मिशन चे सहसचिव व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे अभियान संचालक बी जी पवार, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदाळ, अवर सचिव जायकर , कक्ष अधिकारी प्रसाद स्वामी, राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषिकेश शीलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे, सचिन थोरात, गणेश चव्हाण, निखील रौदाळकर, निवृत्ती शेडगे, संदीप सुखदान, नागपूर बीआरसी संघटनेचे प्रविण तेलतुंबडे, वाॅश व पीएमयू चे मोक्षदी बारसकर यांनी आज कर्मचारी यांचे अडचणी मांडल्या.कृती समितीने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) , जिल्हास्तर कर्मचारी, बीआरसी सीआरसी व वाॅश पीएमयु अंतर्गत कर्मचारी यांचे वेतनासाठी आग्रही राहिली.आकृतीबंध व मॅचचे निर्णयानुसार कायम करणेची मागणी करणेत आली.
पाणी स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलनातील घोषणांनी आझाद मैदान दणाणले..
मुंबई येथे आझाद मैदानावर पाणी स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलनातील घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.आझाद मैदानावर साडेचारशेपेक्षा अधिक कर्मचारी यांनी न्यायिक मागण्या साठी घोषणांनी आंदोलन परिसर दणाणून गेला.बंडू हिवरे, नम्राता गोस्वामी, निखील रैदाळकर, सचिन थोरात, कुमार शिॅदे, निवृत्ती शेडगे, संदूप सुखदान, डाॅ. संजय वाघ, राजा भोसले, बीआरसी सीआरसी चे प्रविण तेलतुंबडे, सुनील सावंत, अनिल निचितें,संपदा बोधनकर , राजेश मोरे, यांनी मार्गदर्शन केले.
आदेश आलेनंतरच आझाद मैदान सोडणार - रमाकांत गायकवाड
महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे मागील सुमारे पाच महिन्यापासून प्रलंबित मागण्यासाठी शासनाने मानधन दिलेले नाही.महाराष्ट्र न्याय प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांनी ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय दिलेला आहे.परंतु तसे न करता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेळेवर मानधन दिले जात नाही.सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय अध्यक्ष कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून न्यायाची अपेक्षा- सचिन जाधव
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलेने कर्मचारी यांचे मध्ये आशा निर्माण झाले आहेत. उद्या मंगळवारी प्रश्ना बाबत मुख्य सचिव यांचे कडे बैठक होत आहे. आज प्रधान सचिव पराग जैन यांचे कडे बैठक झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छतादूतांना न्याय देणेसाठी प्रशासन गतीमान झाले असल्याचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240