श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील मासिक किर्तन सेवेला ११ वर्षे पुर्ण.

 

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प. सुधीर बुवा बाळ.

क्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प. सुधीर बुवा बाळ.श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प. सुधीर बुवा बाळ. महाराज देवस्थान मधील मासिक कीर्तन सेवेला यंदा ११ वर्षे पूर्ण झाली असून १३३ व्या मासिक कीर्तन सेवेचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.या प्रसंगी बोलताना डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळीचे स्वामीभक्त श्री सोमदत्त आसोलकर यांनी देवस्थान समिती व संस्थेचे अध्यक्ष मा. महेश मालक इंगळे यांनी दिलेल्या अखंड स्वामी सेवेचे पुण्य आज फळाला आले असल्याचे भावोद्गार काढले.श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात नामस्मरण, मानसपूजा व कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी सोहळा रंगला. १३३ व्या मासिक कीर्तन सेवेची सांगता डोंबिवली येथील कीर्तनकार ह.भ.प. श्री सुधीर बुवा बाळ यांच्या नारदीय कीर्तनाने झाली.पुढे बोलताना सोमदत्त आसोलकर यांनी स्वामी सेवेचा ध्यास घेऊन अविरत कार्य करणारे श्री नरेश पाटील यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र, शाल व श्रीफळ देऊन डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळींच्या वतीने सत्कार केला.सकाळच्या सत्रात श्री अक्कलकोट स्वामी जप, नामस्मरण व मानसपूजा संपन्न झाली. मानसपूजेचे सूत्रसंचालन भरत डिंगोरकर व संतोष रहाटे यांनी केले. हार्मोनियमवर मयूर स्वामी तर तबल्यावर सुनील शेलार यांनी कीर्तनास उत्तम साथसंगत दिली.या कार्यक्रमास सोमदत्त आसोलकर, प्रिया आसोलकर, भरत डिंगोरकर, संतोष रहाटे, विद्या रहाटे, वैशाली डिंगोरकर, सुधीर बुवा बाळ, नरेश पाटील, सुरेश सुर्वे, राजश्री भिसे, किरण दळवी तसेच मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, प्रा. शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, संतोष जाधव, श्रीशैल गवंडी, रविराव महिंद्रकर, स्वामीनाथ लोणारी, विपूल जाधव, सागर गोंडाळ, महेश मस्कले, श्रीकांत मलवे, खाजप्पा झंपले, दर्शन घाटगे, स्वामीनाथ मुसळे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

दुधनीतील बौध्द समाजांनी जे कामे सुचवतील त्या कामांना प्राधान्य देणार-अप्पु परमशेट्टी.