होटगी गावात दिवसभर तणाव रात्री सामंजसपणाने वाद मिटला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक -अनिल सनगल्ले, वळसंग पोलीस ठाणे. सोलापूर - प्रतिनिधी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे गुरुवारी बकरी ईद दिवशी गोवंश हत्या झाल्याच्या संशयावरून चौकशीसाठी गेलेले गावातील काही हिंदुत्ववादी तरुण आणि मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये वाद झाला होता यावरून होटगी गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते रात्री वळसंग पोलीस ठाण्यात दोन्ही समाजातील प्रमुखांनी एकत्र येऊन गावात शांतता राहण्यासाठी सामंजसपणाने वाद मिटवला होटगी येथे सकाळी अकराच्या सुमारास छोटी बेस परिसरात एका घरात गोवंश हत्या झाल्याची अफवा पसरली गावातील हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांनी त्याची माहिती सोलापुरातील कार्यकर्त्यांना दिली त्यानंतर सोलापुरातील कार्यकर्त्यांसह 50 ते 60 तरुण त्या घरी गेले मात्र तेथे बकरीची कुर्बानी देण्यात आली होती. संशयावरून आमच्या घरी का आलात असे विचारत मुस्लिम तरुणांनी आलेल्या कार्यकर्त्यांना धारेवर धरले यावेळी दोन्ही समूहातील तरुणांची गर्दी वाढली. वळसंग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले हे घट...