कार्यसम्राट न्यूज चे थाटात अनावरण.
सोलापूर- (प्रतिनिधी)
गेली ९ वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा विविध घडामोडीवर नजर ठेवून निरपेक्ष,निर्भीड,सडेतोड परखड लेखन उत्कृष्ट मांडणी रोखठोक लेखन त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात नेहमीच आवाज उठवून सर्वसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यातील जनतेला परिचित असणाऱ्या पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून वृत्तपत्र व्यवसाय न समजता केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या ९ वर्षापासून साप्ताहिक कार्यसम्राट एक आगळा वेगळा वाचक वर्ग निर्माण केला आहे वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट नेहमीच जागल्याची भूमिका पाडली असून नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली आहे याच साप्ताहिक कार्यसम्राट ने वृतपत्र बरोबर डिजिटल मीडियामध्ये प्रवेश केला असून कार्यसम्राट न्युज या नावाने पोर्टल सुरु केलं आहे कार्यसम्राट न्युज या पोर्टलचे थाटात अनावरण राजेश यमपूरे परिमंडळ अधिकारी क विभाग यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.
कार्यसम्राट च्या माध्यमातून समाजजागृती होतं असून कार्यसम्राट म्हणजे समाजाचा आरसा...
साप्ताहिक कार्यसम्राट या वृतपत्रातून नेहमीच समाजाची जनजागृती केली जात असून रोकठोक व परखड लेखन साप्ताहिक कार्यसम्राट ची खसियत असून साप्ताहिक कार्यसम्राट च्या माध्यमातून व लेखणीतून उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका मांडली असं मत कार्यसम्राट न्यूज चे अनावरण करताना परिमंडळ अधिकारी राजेश यमपुरे यांनी व्यक्त करून कार्यसम्राट न्यूज ला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार, पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले, जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख,शहर समन्वयक श्रीकांत कोळी, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240