आषाढी एकादशी वारी म्हणजे वारकऱ्यांचा महाप्रपंच - ह.भ.प.दादा महाराज सोनटक्के.
![]() |
महापुजेनंतर विठ्ठल रुक्मिणीची भावमुद्रा व कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प.दादा महाराज सोनटक्के व सहकारी दिसत आहेत. |
प्रतिनिधी - अक्कलकोट
आषाढी एकादशी हि महाराष्ट्राची महाउपासना आहे. हि उपासना करीत वारकरी दरवर्षी सावळ्या विठ्ठलाला भेटण्याची ओढ मनात साठवून पायी पंढरीची वारी करतात. हि वारी म्हणजे वारकऱ्यांचा एक महाप्रपंच असतो असे निरूपण धाराशीव येथील कीर्तनकार ह.भ.प.दादा महाराज सोनटक्के यांनी केले. आज आषाढी एकादशी निमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित ए.वन चौकातील उपलप विठ्ठल मंदिरात आयोजित किर्तन सेवेत निरूपण करताना ते बोलत होते.
किर्तन सेवेच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ह.भ.प.दादा महाराज सोनटक्के यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. कीर्तन सेवेत पुढे बोलताना दादा महाराज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एका क्रांतीपर्वाची सुरुवात महाराष्ट्रातील संतांनी केली. त्याची जोपासना करण्याचं काम आज लक्षावधी वारकरी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल म्हणून पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात ते केवळ विठ्ठल दर्शनाची आस घेऊनच. पंढरीच्या वाटेने निघालेला वारकरी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शिखरावरचा सोनेरी कळस आहे. त्याची लकाकी आषाढी एकादशीनिमीत्त लाखोंच्या संखेने पंढरीच्या दिशेने पायी वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या या वारीतून दिसून येत असल्याने समस्त भक्तगण या वारीतही विठ्ठलाचे रूप पाहून धन्य होतात असेही निरुपण दादा महाराज यांनी या कीर्तन सेवेत केले. त्यांना उस्मानाबाद येथील अजानुबाहू वारकरी शिक्षण संस्था, व औसा चिकुर्डा येथील विठ्ठल भजनी मंडळाच्या वारकऱ्यांनी साथ संगत केली. किर्तन सेवेच्या प्रारंभी आज आषाढी एकादशी निमित्त मंदीरातील विठ्ठल रुक्मिणी देवतांस वटवृक्ष देवस्थानकडून समितीचे चेअरमन महेश इंगळे व पुणे येथील विठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमती आरती उपलप यांच्या हस्ते पुरोहित राघवेंद्र बागेवाडीकर व दिपक बागेवाडीकर, मनोहर देगांवकर यांच्या मंत्रोच्चारात पहाटे ५ वाजता महाअभिषेक महापुजा संपन्न झाली. यानंतर विठ्ठल मंदीर पटांगणात सकाळी ७ ते ९ या वेळेत मराठवाडयातील श्री.विठ्ठल भजनी मंडळ (चिकूर्डा, जि.लातूर) व अजानुबाहू वारकरी शिक्षण संस्था (उस्मानाबाद) यांची भजनसेवा श्रींच्या चरणी समर्पित झाली. तदनंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत उस्मानाबाद येथील ह.भ.प. दादा महाराज सोनटक्के यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. या एकादशी निमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिरास विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले होते. एकादशी निमित्त येणाऱ्या वारकरी भाविकांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त आरती उपलप यांच्या हस्ते उपवासाचे शाबूू खिचडी, केळी प्रसाद, चहा, कॉफी इत्यादी फराळ प्रसादांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, पुरोहित राघवेंद्र बागेवाडीकर, दीपक बागेवाडीकर, मनोहर देगावकर, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, शिवशरण अचलेर, संतोष फुटाणे-जाधव, संतोष पराणे, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, संजय मोरे, स्वाती गाडे-जाधव, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे, जयश्री माने, सोनी चव्हाण, रविराव महिंद्रकर, खाजप्पा झंपले, चंद्रकांत सोनटक्के, श्रीमुख जगदाळे, संतोष जमगे, महादेव तेली, दिपक जरिपटके, प्रसाद सोनार, मल्लीनाथ बोदले, चंद्रकांत डांगे, चंद्रकांत गवंडी आदींसह अनेक भाविक व वारकऱ्यांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेचा व श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. आज दिवसभर येथील स्थानिक भाविकांसह परगांवाहून आलेल्या भाविकांनी मोठ्या संखेने श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून कृतार्थ झाले.
------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240