कार्यसम्राट न्यूज चे सांगली येथील पोलीस उप अधीक्षक सुनील साळुंखे यांच्या हस्ते थाटात अनावरण.




सोलापूर-(प्रतिनिधी)
गेली ९ वर्षांपासून सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक अशा विविध घडामोडीवर नजर ठेवून निरपेक्ष निर्भीड सडेतोड परखड लेखन उत्कृष्ट मांडणी रोखठोक लेखन त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून  प्रशासन दरबारात नेहमीच आवाज उठवून सर्वसामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यातील जनतेला परिचित असणाऱ्या पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून वृत्तपत्र व्यवसाय न समजता केवळ एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या ९ वर्षापासून साप्ताहिक कार्यसम्राट एक आगळा वेगळा वाचक वर्ग निर्माण केला आहे. वंचित पीडित घटकाच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राट नेहमीच जागल्याची भूमिका पाडली असून नेहमीच न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.याच साप्ताहिक कार्यसम्राटने वृतपत्र बरोबर डिजिटल मीडियामध्ये  प्रवेश केला असून कार्यसम्राट न्युज या नावाने  पोर्टल सुरु केलं आहे.कार्यसम्राट न्युज या पोर्टलचे मोठ्या थाटात अनावरण  सांगली येथील(डबल हिंद केसरी -सिंघम)पोलीस  उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले  आहे.
पत्र नव्हे शस्त्र कार्यसम्राट वृत्तपत्राच्या माध्यमातून  सोलापूर शहर व जिल्ह्यातील  वेगवेगळ्या विषयावर  सडेतोड लेखन उत्कृष्ट मांडणी निरपेक्ष निर्भीड  लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून कार्यसम्राटने आपली भूमिका बजावली असून  वृत्तपत्रांमध्ये आपले स्थान बळकट केले आहे.
असं मत सांगली येथील (डबल हिंद केसरी) असलेले  कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी व्यक्त करून कार्यसम्राट न्यूजला शुभेच्छा दिल्या आहेत. 
याप्रसंगी कार्यसम्राट न्यूज चे संपादक यशवंत पवार,उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ.आशिषकुमार सुना,पोलीस उपनिरीक्षक खरात,जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे,सुरेश आयवळे आदी उपस्थित होते.
---–--------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०


Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर