शिव विचार प्रतिष्ठान आयोजित आषाढी एकादशी निमित्त १० हजार वारकऱ्यांना शाबुदाना खिचडी वाटप !
प्रतिनिधी-सोलापूर
टेंभुर्णी येथील शिव विचार प्रतिष्ठान आयोजित आषाढी एकादशी निमित्त १० हजार वारकऱ्यांना शाबुदाना खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.यावेळी सौ.सुनंदा शिंदे यांच्या समवेत वारकऱ्यांना फराळ वाटप केले. विठुरायाच्या कृपेने वैष्णव भक्तांची अन्नदानाची सेवा करण्याची संधी मिळाली हे म्हणजे भाग्यच.
शिव विचार प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांसाठी तसेच समाजातील अन्य घटकांसाठी वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात येते. आजच्या या वारकऱ्यांसाठी शाबुदाना खिचडी वाटप कार्यक्रम स्तुत्य होता. याबद्दल सर्वांचे कौतुक करत अभिनंदन केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.प्रदीप दादा गारटकर, श्री.बंडू नाना ढवळे, श्री.नागाभाऊ खटके, श्री.रामभाऊ वाघमारे, श्री.नागेश बापू खटके, शिव विचार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.विजय खटके, श्री.सचिन होदाडे, शिव विचार प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240