अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी संतोष म्हेत्रे यांची निवड.
सोलापूर - प्रतिनिधी
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यशवंत पवार हे होते या बैठकीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध विषयांवर चर्चा होऊन अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी संतोष म्हेत्रे यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदूरकर महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख सोपने मामा यांच्या आदेशानुसार
एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते नूतन जिल्हा कार्याध्यक्ष संतोष म्हेत्रे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संतोष म्हेत्रे यांचा परिचय...
संतोष म्हेत्रे हे दैनिक तुफान क्रांती चे सोलापूर शहर प्रतिनिधी तसेच साप्ताहिक कार्यसम्राट चे जिल्हा प्रतिनिधी असून ते पत्रकार सुरक्षा समितीचे मा पश्चिम महाराष्ट्र संघटक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने केलेल्या आंदोलन उपोषण निवेदन या बाबत सक्रिय सहभाग घेतला असून पत्रकारांच्या प्रश्नाची त्यांना चांगली जाणीव आहे
पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन दरबारात आवाज उठवणार.
महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मूलभूत प्रश्नावर आपण आक्रमक भूमिका घेऊन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आपण प्रशासन दरबारात त्यांचे प्रश्न पोटतिडकी ने मांडून आवाज उठवणार असल्याचे या निवडी नंतर संतोष म्हेत्रे यांनी सांगितले या सत्कार प्रसंगी अमर डुरके,अमसिद्ध व्हनमाने,भीमाशंकर पुजारी सिद्धार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240