वटवृक्ष मंदिरातील सुशोभीकरण पाहून मन प्रफुल्लित होतं - उपायुक्त कुलकर्णी.
![]() |
त्रिगुणी कुलकर्णी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. |
प्रतिनिधी -अक्कलकोट
श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सीम भक्त आहोत. नेहमी नसले तरी आज अनेक दिवसांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा योग आला. गाभारा सुशोभिकरण व नूतनीकरण यानंतर वटवृक्ष मंदिराची भव्यता पाहून आपण भारावलो असून त्यामुळे येथे आल्यानंतर मन नेहमीच प्रफुल्लित होते असे मनोगत पुण्यातील पुरवठा खात्याचे विभागीय उपायुक्त त्रिगुणी कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी बोलताना कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना कुलकर्णी यांनी स्वामी दर्शनाकरिता अनेक वर्षापासून येथे येत असतो. देवस्थानचे तत्कालीन चेअरमन कै.कल्याणराव इंगळे यांनीही अनेक विकासाभिमुख बदल घडवून स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, परिणामी अक्कलकोटला स्वामी भक्तांची संख्या वाढत गेली. आज त्यांचे चिरंजीव महेश इंगळे हे देखील वेळोवेळी स्वामी भक्तांना विविध सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात. यंदाच्या उन्हाळ्यात आता येथे आलो असता प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या भाविकांना वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीने वातानुकुलित परिसर उपलब्ध करून स्वामी भक्तीचा गारवा अनुभवण्यास उपलब्ध करून दिला. गाभारा सुशोभिकरणा नंतर पुरातन गाभाऱ्यातून स्वामी दर्शन होत असल्याने वटवृक्ष मंदिराची भव्यदिव्यता आणखीन उजळून येत आहे असेही मनोगत त्रिगुणी कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार बाळासाहेब सिरसट, विजय दुबे, राजशेखर चौधरी, दिलीप काजळे, सोमनाथ वचकन, गणेश डांगे, श्रीकांत शेठे, अशोकराव पाटील, दीपक, उपदय, रवींद्र मोरे, निखिल पेंटर, बसवराज बिराजदार, रमेश शर्मा, विनायक होटकर, शिवचलप्पा चव्हाण, मल्लिनाथ ढंगापुरे, गुडुभाई शेख, पंचप्पा म्हेत्रे, सुनील नंदीकोले मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शिवशरण अचलेर, संजय पवार, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.
--------------------------------------▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240