बा... विठ्ठला राज्यातील बळी राजाला सुखी,समाधानी ठेव व महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे..! राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांचे विठ्ठल चरणी साकडे.




प्रतिनिधी-पंढरपूर(जयसिंग मस्के)
दि.२९जून,२०२३ पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त विठठ्ल मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा पार पडली.याप्रसंगी मुख्यमंत्री यांच्या समवेत, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील,आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व अन्य मंत्री महोदय उपस्थित होते.महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी माणूस, वंचित शोषित पिडीत व्यक्तीला सुखी समाधानी ठेव..राज्यात चांगला पाऊस पडू दे..असे साकडे मुख्यमंत्री महोदय यांनी पांडुरंगाला घातले.प्रशासनाच्या वतीने पंढरपूरात,चांगले रस्ते, पाणी,शुलभशौचालय,चंद्रभागा नदी व घाटाचा परिसरात स्वच्छ करण्यात आला असून, भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन देखील वारी काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सतत लक्ष ठेवून काम करीत आहे.पंढरपूरात लाखो भाविक आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरी दाखल झाले आहेत.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर