जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी - अक्कलकोट
दि.२६ जून २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर ता. अक्कलकोट येथे शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली समतेची शिकवण देणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४९ वी जयंती साजरी करण्यात आली.सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा. प्रत्येक नागरिकांना समान न्याय मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराजांना आठवले जाते.राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. महाराजांच्या वडिलांचे नाव जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव हे यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज,राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू व चौथे साहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते.
यादिनी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु.आलिया संगोळगी हीने छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय पोतदार आणि शाळेचे शिक्षक यलप्पा पुटगे,हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे,हाजराबी बागवान,संध्या बशेट्टी, दिनकर भारती आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240