होटगी गावात दिवसभर तणाव रात्री सामंजसपणाने वाद मिटला.
![]() |
सहाय्यक पोलीस निरीक्षक -अनिल सनगल्ले,वळसंग पोलीस ठाणे. |
सोलापूर - प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे गुरुवारी बकरी ईद दिवशी गोवंश हत्या झाल्याच्या संशयावरून चौकशीसाठी गेलेले गावातील काही हिंदुत्ववादी तरुण आणि मुस्लिम समाजातील तरुणांमध्ये वाद झाला होता यावरून होटगी गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते रात्री वळसंग पोलीस ठाण्यात दोन्ही समाजातील प्रमुखांनी एकत्र येऊन गावात शांतता राहण्यासाठी सामंजसपणाने वाद मिटवला
होटगी येथे सकाळी अकराच्या सुमारास छोटी बेस परिसरात एका घरात गोवंश हत्या झाल्याची अफवा पसरली गावातील हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांनी त्याची माहिती सोलापुरातील कार्यकर्त्यांना दिली त्यानंतर सोलापुरातील कार्यकर्त्यांसह 50 ते 60 तरुण त्या घरी गेले मात्र तेथे बकरीची कुर्बानी देण्यात आली होती. संशयावरून आमच्या घरी का आलात असे विचारत मुस्लिम तरुणांनी आलेल्या कार्यकर्त्यांना धारेवर धरले यावेळी दोन्ही समूहातील तरुणांची गर्दी वाढली.
वळसंग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले हे घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला त्यानंतर पोलिसांनी दोन्ही समाजातील तरुणांना आफवेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.वळसंग पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या उपस्थितीत दोन्ही समाजातील प्रमुख मंडळी कार्यकर्ते आणि तरुणांची चर्चा झाली.यावेळी गावात शांतता राखण्याच्या विचाराने सामंजस्यपणाने वाद मिटवण्यात आला.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240