महेश इंगळे हे आध्यात्मातील लोकनेते -डॉ.श्रीकांत शिंदे

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा देवस्थान कार्यालयात सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.



प्रतिनिधी - अक्कलकोट
श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थान करिता समर्पित करून स्वामी भक्तांच्या सेवेत अहोरात्र झटत आहेत, हे पाहून मनाला अत्यंत समाधान वाटले. भाविकांना वेळोवेळी सर्वोत्तम सोई सुविधा व उत्तम दर्शन नियोजन करून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त स्वामी भक्त कसे स्वामींचे दर्शन घेतील याकडे महेश इंगळे यांचा नेहमीच कटाक्षाने लक्ष असतो. त्यामुळे ते स्वतः स्वामींच्या सेवेत आपले जीवन समर्पित करून भाविकांना नेहमीच सुलभ स्वामी दर्शन व्हावे याकरिता वेळोवेळी विविध नियोजन करीत असतात. त्यांचे कार्य पाहता भाविकांना स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था करणारे महेश इंगळे हे आध्यात्मातील लोकनेते असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी डॉ.श्रीकांत शिंदे यांचा सपत्निक स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे बोलत होते. याप्रसंगी डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या समवेत असलेले वृषालीताई श्रीकांत शिंदे, विपुल कदम, स्वीय साहय्यक प्राजक्ता जावरे पाटील, कौस्तूभ जोशी यांचाही महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सन्मान केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे, तालुका प्रमुख संजय देशमुख, सो.म.पाचे माजी नगरसेवक मनोज शेजवाल, शहर प्रमुख योगेश पवार, डॉ.बसवराज बिराजदार, उमेश पांढरे, विनोद मदने, महीला तालुका प्रमुख वर्षा चव्हाण,शहर प्रमुख वैशाली हावनूर, तालुका उपप्रमुख अनिता घोडके, शहर उपप्रमुख वर्षा म्हेत्रे, अश्विनी पाटील, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०




Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर