राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त फकिरा दलाच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार.
प्रतिनिधी -अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील अण्णाभाऊ साठे नगर येथे फकीरा दलाच्या वतीने लोकराजा,आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची १४९ व्या जयंती निमित्त इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या,पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मातंग समाज अध्यक्ष निवृत्ती पारखे आधारस्तंभ किसन(भाऊ) जाधव,भानुदास देडे, मेजर अंबादास देडे, फकीरा दल शहर प्रमुख स्वामीनाथ कांबळे,उपप्रमुख हर्षवर्धन देडे, रोहित मूतनकेशी,समर्थ कोळी,छगन पाटोळे, योगीराज पारखे, प्रकाश कामनळी, सूरज जगताप, नितीन पारखे, बंडू बंडगर, भीमा जगताप,सुरज जगताप,दर्शन धसाडे, अभिषेक शितोळे आदी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाचे आयोजक फकीरा दल जिल्हा प्रमुखजय (भाऊ)पारखे यांनी मानले.
------------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240