सातारा येथे पश्चिम महाराष्ट्र विभागीय- मातंग परिषदेचे आयोजन.
प्रतिनिधी- पंढरपूर(जयसिंग मस्के)
दि. ३ जुलै, २०२३ रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने, पश्चिम महाराष्ट्रातील मातंग समाजातील विविध सामाजिक संघटनेतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची मातंग समाजातील विविध प्रलंबित विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय - शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या विभागीय मातंग परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार, जयदेव गायकवाड व पंडीत कांबळे यांच्या, मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, सोलापूर जिल्ह्य़ातून जास्तीत जास्त मातंग समाजातील विविध सामाजिक संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन जिल्हाअध्यक्ष प्रा.डाॅ.धनंजय साठे यांनी केले आहे.![]() |
जिल्हाअध्यक्ष - प्रा.डाॅ.धनंजय साठे |
वेळ- दुपारी १:०० वाजता
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240