राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
प्रतिनिधी -सोलापूर,
लोककल्याणकारी राजे, दूरदृष्टीचे समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जगजीवन राम वस्ती, मोदी, सोलापूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वह्या) वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
लोककल्याणकारी राजे, दूरदृष्टीचे समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जगजीवन राम वस्ती, मोदी, सोलापूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वह्या) वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
संस्थेचे अध्यक्ष दीपक गवळी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. यावेळी युवा उद्योजक साजनजी हावळे, बाबू म्हेत्रे, संतोष कदम, जेबी ग्रुपचे अध्यक्ष विक्की बनसोडे, एसपी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर पांडगळे, सोनू खरात, सुजित उपलाकर, दीपक म्हेत्रे, राहुल सोनवणे, ईश्वर कांबळे, मंथन जानवेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना बळ देण्याचे कार्य अत्यंत स्तुत्य असून, संस्थापक दीपक गवळी यांच्या पुढील सामाजिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.
----------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240








Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240