श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेशजी इंगळे यांनी घेतले शिर्डी साईबाबांचे दर्शन.

शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गराडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व साईबाबांची प्रतिमा देऊन महेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. छायाचित्रात हा प्रसंग दिसत आहे.
प्रतिनिधी -अक्कलकोट 
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश इंगळे यांनी आपल्या मित्रपरिवारासह शिर्डी येथे जाऊन श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईंच्या मध्यान्न नैवेद्य आरतीस उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गराडे यांनी महेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ व साईबाबांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. तत्पूर्वी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.दर्शनानंतर महेश इंगळे यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व विश्वस्तांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिर्डी संस्थानच्या व्यवस्थापन पद्धती, भाविकांसाठी उपलब्ध सुविधा, दर्शनरांग व्यवस्था, निवास सुविधा तसेच विविध धार्मिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही देवस्थानांच्या कामकाजाची पद्धत, भाविक सेवेचे नियोजन आणि भविष्यातील विकासकामांबाबत विचारांची देवाणघेवाण झाली. या चर्चेनंतर महेश इंगळे यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी श्रीशैल गवंडी, प्रा. शिवशरण अचलेर, सुनिल पवार, अंकूश केत, बाळासाहेब एकबोटे, स्वामीराव मुसळे, तुषार मोरे, रविंद्र महाले, वाहतूक पोलीस नियंत्रक बणजगोळ यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.
--------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 

🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

 

Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.