पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराकडून भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न.
जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी १.३० वाजता पत्रकार कृती समितीचे सक्रिय सदस्य तथा साप्ताहिक सोलापूर संघर्ष न्यूज नेटवर्कचे संपादक गिरमल्ला गुरव आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुधाकर मिरजकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी एल.एल.बी. परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचा शाल, टोपी व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम तिसरी आंख मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार व मान्यवर अशोक ढोणे, मिलिंद प्रक्षाळे, नितीन करजोळे, ईनुस अत्तार, विजयकुमार उघडे, सिध्दाराम नंदर्गी, डॉ. राम हुडांरे, अक्षय बबलाद, अकबर शेख, नितीन कांबळे, विश्वनाथ व्हनकुरे, विजयकुमार झुंज्जा, कलिम पटेल, शिवय्या स्वामी, अशोक सोनटंकले, जहिर नदाफ, आंबा तळभंडारे, सुधीर डोळ्ळे, ऋषिकेश ढेरे, श्रीनिवास बनसोडे, गणेश भालेराव, रेणुका वटारे, वैशाली बनसोडे यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गिरमल्ला गुरव, सुधाकर मिरजकर आणि विश्वभूषण कांबळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
--------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240





Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240