खासदार चंद्रकांत हांडोरे यांची सदिच्छा भेट; अण्णाभाऊ साठे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण.


प्रतिनिधी -सोलापूर 
भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार मा. चंद्रकांत हांडोरे साहेब आणि त्यांच्या पत्नी सौ. संगीता आई हांडोरे यांची मुंबई येथील चेंबूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


भेटीदरम्यान मा. चंद्रकांत हांडोरे साहेब व सौ. संगीता आई हांडोरे यांचा शाल, पुष्पगुच्छ तसेच हांडोरे साहेबांचे रेखाटलेले छायाचित्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आगामी काळात सोलापूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.
या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मा. शशी बनसोडे साहेब, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख मा. एन. के. कांबळे साहेब उपस्थित होते. तसेच सोलापूर शहर भीमशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष मनोज लोंढे, सिद्धार्थ तालीम संघाचे प्रमुख विनोद दादा वाघमारे, निखील पवार, गणेश वाघमारे, रविकांत कांबळे, पृथ्वीराज लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भेटीमुळे सामाजिक कार्य, संघटनात्मक बांधणी आणि आगामी उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.
--------------------------------------
🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 

🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240




Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.