राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना : ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

प्रतिनिधी -सोलापूर,  

राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत अर्ज सादर करावेत. अर्ज भरण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळाचा वापर करावा. विहित मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत व मुदतवाढ दिली जाणार नाही.

योजनेअंतर्गत मंजूर मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.योजनेअंतर्गत मंजूर मानधन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

वयाचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / तहसीलदार यांनी दिलेले अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र.

आधार कार्ड.

तहसीलदार यांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 60,000 पेक्षा कमी असावे).

रहिवासी दाखला (डोमिसाईल प्रमाणपत्र).

नोटरीकृत प्रतिज्ञापत्र :

शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असल्यास त्याचा तपशील व मिळणारी रक्कम.

लाभ घेत नसल्यास त्याबाबतचे नोटरीकृत प्रतिज्ञापत्र.

सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याचे घोषणापत्र.

विविध पूरक पुरावे.

ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी व पोलीस पाटील यांचा संयुक्त दाखला (कलाक्षेत्रातील सहभागाबाबत), मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या सूचनेनुसार.

पात्रता निकष

अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता असून त्यांच्यासाठी किमान वय 40 वर्षे आहे.

कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान 15 वर्षांचे योगदान असणे आवश्यक.

साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची कामगिरी केलेली असावी.

वयस्कर, विधवा, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाईल.

कुटुंबाचे वार्षिक एकूण उत्पन्न रु. 60,000 पेक्षा जास्त नसावे.

उपजीविका मुख्यतः कलेवर अवलंबून असलेले अथवा पूर्वी कलेवर अवलंबून असलेले आणि सध्या इतर कोणतेही उत्पन्न नसलेले कलाकार पात्र राहतील.

केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे कलाकार पात्र ठरणार नाहीत.

अर्जदार कलाकार/साहित्यिक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

पात्र साहित्यिक व कलाकारांनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

----------------------------------------------------------

🔹जनता संघर्ष न्यूज, सोलापूर 

🔹संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 

🔹बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240



Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.