सोलापूर पॅटर्नचा राज्यभर विस्तार; जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ कोटींचे विमा सुरक्षा कवच – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे.
सोलापूर जिल्हा परिषदेने १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राबविलेल्या ‘सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच’ योजनेची दखल घेत राज्य सरकारने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही घोषणा करत सोलापूर जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात केंद्रप्रमुख पदस्थापना आदेश वितरण, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच करार तसेच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना नवीन वाहनांच्या चाव्या प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती आणि पंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांच्या चाव्यांचे वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर केंद्रप्रमुख पदस्थापना आदेश आणि विमा सुरक्षा कवच करार वितरण सोहळा पार पडला.यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “सोलापूर जिल्हा परिषदेने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. सामान्य जनतेला सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सोलापूर पॅटर्नचा अभ्यास करून राज्यातील सर्व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांपर्यंतचे विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.”
ते पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत अपघातामुळे अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार जास्तीत जास्त ८० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत, कर्मचाऱ्यांच्या अपत्यांच्या विवाहासाठी सहाय्य, एका अपत्याच्या उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंत मदत अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
केंद्रप्रमुख पदस्थापनेबाबतही त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कौतुक केले. राज्यभरातून केंद्रप्रमुख पदे भरण्याबाबत निवेदने प्राप्त होत असताना सोलापूर जिल्हा परिषदेने ही प्रक्रिया पूर्ण करून पदस्थापना आदेश वितरित केल्याबद्दल शिक्षण व प्रशासन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सोलापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली असून या करारामुळे १० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण आणि इतर विविध लाभ मिळणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे व शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.
या कार्यक्रमामुळे कर्मचारी कल्याण, प्रशासनिक कार्यक्षमता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यासाठी एक नवा आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

----------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240