विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने अक्कलकोट पर्यटनावर संशोधन; प्रा. मयूर स्वामी यांचा निबंध आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रकाशित

प्रतिनिधी-अक्कलकोट,
 सी. बी. खेडगीज महाविद्यालय, अक्कलकोट येथील प्रा.मयूर स्वामी यांचा “श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट : आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून सामाजिक-आर्थिक परिणाम आणि विकसित भारत २०४७ साठीच्या संधी” या विषयावरील संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील ई-परिषदेत प्रकाशित झाला आहे.सर्वोदय शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, उमदी (जि. सांगली) आणि ग्लोबल फाउंडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “टुरिझम डेव्हलपमेंट इन इंडिया : प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स इन व्ह्यू ऑफ विकसित भारत २०४७” या एकदिवसीय बहुविषयक आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत हा संशोधन निबंध सादर करण्यात आला.या संशोधनात श्री स्वामी समर्थ मंदिरामुळे अक्कलकोट परिसरात विकसित झालेल्या आध्यात्मिक पर्यटनाच्या सामाजिक व आर्थिक परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. तसेच विकसित भारत २०४७ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध संधी, रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि शाश्वत पर्यटनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
या संशोधन निबंधामुळे अक्कलकोटचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून असलेले स्थान अधिक अधोरेखित झाले आहे. प्रा. मयूर स्वामी यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. बसलिंगप्पा खेडगी, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, प्राचार्य गुरुलिंगप्पा धबाले, डॉ. आबाराव सुरवसे, प्रा. संतोष वगाले आणि महेश स्वामी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
----------------------------------------
🔹 जनता संघर्ष न्यूज,सोलापूर 
🔹संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
🔹 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240


Comments

Popular posts from this blog

करजगी येथे श्री १०८ ष.ब्र.शिव सोमनाथ शिवाचार्य महास्वामीजी संस्थान हिरेमठ संस्थान मठाच्या मठाधिपतींचा भव्य पट्टाधिकार व पट्टाभिषेक सोहळा उत्साहात संपन्न.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपदा मित्र-सखींकडून स्वच्छता मोहीम

कोनापुरे चाळ नागरी आरोग्य केंद्रात अमित कांबळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार.